शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

परवाने नूतनीकरणाला थंड प्रतिसाद

By admin | Updated: November 21, 2015 02:54 IST

नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशारा परिवहन विभागाने देऊनही त्याकडे रिक्षा चालकांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. राज्यातील १ लाख

मुंबई : नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशारा परिवहन विभागाने देऊनही त्याकडे रिक्षा चालकांनी दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ पैकी अवघ्या १५ हजार रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले असून परिवहन विभागावरच नामुष्कीची वेळ आली आहे. नूतनीकरणासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून परिवहन विभाग आता कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षांचे परवाने विविध कारणास्तव रद्द झाले होते. अशा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय १ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला आणि ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क लागू करण्याबाबत सर्व परिवहन प्राधिकरणांना निर्देश देण्यात आले. नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याने रिक्षा या प्रक्रियेसाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि नूतनीकरण न केल्यास परवाने कायमचे रद्द केले जातील, असा कठोर इशाराही दिला. दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे ३0 नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाची मुदत वाढवण्यात आली. नूतनीकरण करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये सर्वाधिक मुंबईतील अंधेरी, वडाळा आरटीओ, बोरीवली उपप्रादेशिक आरटीओतंर्गत ८७९ रिक्षांचे, ठाणे विभागात २ हजार ६८७, पुणे विभागात २ हजार १३0 आणि नाशिक विभागात २ हजार ६४६ रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले. तर राज्यातील अन्य विभागात यापेक्षाही फार कमी प्रतिसाद मिळाला आहे. ३१ आॅक्टोबरपासून नूतनीकरणास सुरुवातनूतनीकरणासाठी विविध परिवहन प्राधिकरणांनी लागू केलेली सहमत शुल्काची रक्कम आॅटोरिक्षा परवानाधारक भरू शकले नाही. राज्यातील विविध परिवहन प्राधिकरणांनी प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सहमत शुल्काची रक्कम वाजवी आकारुन परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात सहमत शुल्काची कमाल मर्यादा ३१ आॅक्टोबर २0१५ पर्यंत लागू राहील, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आणि नूतनीकरणाला सुरुवात केली.परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू आहे. आता दहा दिवस शिल्लक असून किती प्रतिसाद मिळतो हे पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. - सतीश सहस्रबुद्धे, अपर परिवहन आयुक्त