शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विश्रीामगृहासाठी आचारसंहिता लावणार

By admin | Updated: July 29, 2016 19:29 IST

औरंगाबाद येथील शासकीय वसाहत असणा-या लेबर कॉलनीत अनधिकृतपणे वर्षानुवर्षे राहणा-या सेवानिवृत्त कर्मचारी आणि पोटभाडेकरुंची निवासस्थाने एका महिन्यात रिकामे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ : औरंगाबाद येथील शासकीय वसाहत असणा-या लेबर कॉलनीत अनधिकृतपणे वर्षानुवर्षे राहणा-या सेवानिवृत्त कर्मचारी आणि पोटभाडेकरुंची निवासस्थाने एका महिन्यात रिकामे करुन घेण्याची कारवाई केली जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. तसेच शासकीय विश्रामगृहात महिना-महिना ठाण मांडणा-यांसाठी लवकरच आचारसंहिता लागू करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

लेबर कॉलनीतील शासकीय निवासस्थाने खासगी व्यक्तींना देणा-यांवर कारवाई करण्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, १९५४ साली कामगारांसाठी लेबर कॉलनी उभारण्यात आली. १९६६ साली राज्याच्या निर्मितीनंतर ही कॉलनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर विविध शासकीय विभागात काम करणा-या सरकारी कर्मचा-यांसाठी हि निवासस्थाने देण्यात आली. १९८० पासून ही निवासस्थाने रिकामे करुन घेण्याची कारवाई केली जात आहे. कधी न्यायालयाची स्थगिती तर स्थानिकांच्या भावनांच्या उद्रेकामुळे हा प्रश्न रखडला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निष्कासनाची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. सध्या याठिकाणी ३३८ निवासस्थाने आहेत. यातील काही निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. लेबर कॉलनीत १५ सेवानिवृत्त कर्मचारी आणि १२७ पोटभाडेकरु आहेत. या सर्वांना निवासस्थाने रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे. येत्या महिनाभरात ही कारवाई करण्यात येईल. रहिवाशांनी ऐनवेळी न्यायालयाची स्थगिती मिळवू नये यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात कव्हेट दाखल करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान सतिष चव्हाण, भाई जगताप, जयंत पाटील, नारायण राणे आदींनी उपप्रश्न विचारले. विश्रामगृहातील घुसखोरांची हकालपट्टीमुंबईतील चर्चगेटसह इतर ठिकाणच्या शासकीय विश्रामगृहातील खोल्या देण्यासाठी आचारसंहिता लावण्यात येईल. चार दिवसांपेक्षा जास्त दिवस खोली बुक करता येणार नाही. कोणालाही महिना महिना विश्रामगृहात ठाण मांडू दिले जाणार नाही. दर आठवड्याला बुकींग रेकॉर्डची तपासणी केली जाईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ------------------------------