शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणची वाईन उद्योजकांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 16, 2015 23:44 IST

सात वर्षे फॉर्म्युले पडूनच : कोकणातील आंबा, करवंद, जांभळावरील वायनरी संकटात

रत्नागिरी : कोकणात आंबा, काजू, करवंद, कोकम, चिकू, फणस या फळांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, प्रक्रियेअभावी लाखो टन फळे वाया जातात. हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन कुलगुरु डॉ. विजय मेहता यांनी वायनरी संशोधन प्रकल्पाला मंजुरी दिली व द्राक्षाच्या धर्तीवर या फळांपासून वाईन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यशही आले. मात्र, विद्यापीठाने तयार केलेल्या वाईन प्रकल्पाला ७ वर्षे उद्योजकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कृषी विद्यापीठाच्या वाईन निर्मितीला राजमार्ग मिळालेला नाही.२००७ साली या प्रकल्पातून २२ लाख रुपये खर्चून वाईन निर्माण केली गेली. लाखो टन वाया जाणाऱ्या काजूबोंडांपासून वाईन निर्माण करण्याचा निर्णय विद्यापीठस्तरावर घेण्यात आला. उद्यान विद्या विभागप्रमुख डॉ. पराग हळदणकर यांनी हा प्रस्ताव मेहता यांच्याकडे मांडला. त्यांनी हिरवा कंदील दाखवताच हळदणकर, राजेंद्र आग्रे, गिरेश चव्हाण यांनी संशोधनाला सुरुवात केली. विद्यापीठाचा वाईनरी प्रकल्प प्रायोगिकतत्त्वावर सुरु झाला. काजूबोंडांपासून वाईन बनवण्याचा नाशिक येथील टेस्टिंग लॅबचे रिपोर्ट उत्कृ ष्ट आल्यानंतर करवंदापासून वाईन बनवून करंवदाला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. हा प्रयोगही यशस्वी झाला. जांभूळ, कच्चा आंबा, पिका आंबा अशा फळांची वाईन बनविण्यात विद्यापीठाला यश आले. संयुक्त संशोधन समितीने या प्रकल्पाला मान्यताही दिली आहे. डॉ. सी. डी. पवार, डॉ. प्रभूदेसाई, एस. जी. कस्तुरे, जीवन कदम या शास्त्रज्ञांनी वाईनचा प्रयोग यशस्वी केला आहे. विस्तार संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरु आहे.विद्यापीठाच्या वायनरी प्रकल्पाला शेतकरी उद्योजक यांनी भेट देऊन संशोधन समजून घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रयत्न सुरु असले तरी गेल्या सात वर्षात एकही उद्योजक विद्यापीठाच्या वाईनचा प्रकल्प स्वीकारायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. शास्त्रज्ञांकडून यासंदर्भातील तांत्रिक माहिती पुरविली जाणार आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ फळप्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करीत असले तरी शेतकरी व उद्योजक मात्र वायनरी प्रकल्पाबाबत उदासीन असल्याचे समोर येत आहे.द्राक्षापासून वाईन त्याबरोबरच फळांपासून वाईन निर्मितीचा प्रयत्न केला जात असताना विद्यापीठ स्तरातील शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांना उद्योजकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यापीठाचा हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. (प्रतिनिधी)