शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रचाराचा नारळ फुटणार?

By admin | Updated: June 19, 2016 02:55 IST

शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता गोरेगावात विशेष मेळावा होत असून, मित्रपक्ष भाजपाबरोबर सुरू असलेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला

मुंबई : शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सायंकाळी ५ वाजता गोरेगावात विशेष मेळावा होत असून, मित्रपक्ष भाजपाबरोबर सुरू असलेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वेळी शिवसैनिकांना कोणता आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सेनेकडून एक प्रकारे आरंभ केला जाणार आहे. त्यामुळे उद्धव यांच्या भाषणाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आहे. मुंबईसह राज्यात व केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या भाजपा-सेना युतीमधील कलह लपून राहिलेला नाही. उलट गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ऐकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पालिकेच्या विषयांपासून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर झालेल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी सेनेने अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्याला भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने, त्यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस रंगू लागला आहे. एकमेकांना निजामाचे बाप, रझाकार म्हणून संबोधण्याबरोबरच, ‘सामना’ व ‘तरुण भारत’ या मुखपत्रांतून तोंडसुख घेतले आहे. त्याचबरोबर, सोशल मीडियावरूनही त्यांच्यात चकमकी झडत असल्याने, आगामी पालिकेच्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, अशीच चिन्हे वर्तविली जात आहेत. भाजपाचे शनिवारपासून पुण्यात चिंतन शिबिर सुरू झाले असून, त्यामध्ये कोणती भूमिका मांडली जाते, याकडे सेना नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारा वर्धापन दिन मेळावा महत्त्वपूर्ण ठरतो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता आदेश देतात, भाजपा नेत्यांच्या टीकेला काय उत्तर देतात, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात उद्याच्या मेळाव्यातून होणार आहे. (प्रतिनिधी)खासदार-आमदारांची उपस्थितीगोरेगावातील राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मेळाव्याची सेना नेत्यांनी तयारी केली असून पक्षाचे मंत्री, खासदार-आमदार, तसेच राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात पक्षाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात येणार असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक भाषणाच्या ध्वनिफित, तसेच त्यांच्या सभा, मेळाव्याच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.