शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

किनारपट्टीवर ३५०० सुरक्षा रक्षक

By admin | Updated: January 24, 2015 01:54 IST

संभावीत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर ३ हजार ५०० सागरी सुरक्षा रक्षक सज्ज करण्यात आले आहेत.

जयंत धुळप - अलिबागसंभावीत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर ३ हजार ५०० सागरी सुरक्षा रक्षक सज्ज करण्यात आले आहेत. मच्छीमार बांधवांना विश्वासात घेऊन, ‘सागरी रक्षक दलां’ची स्थापना करण्याची संकल्पना पुढे आली. या सागर रक्षक दलांतील सदस्यांना पोलिसांकडून ओळखपत्रे देण्यात आली आहेत. समुद्रात मच्छीमारी करीत असताना तसेच किनारी भागात वावरताना नेमकी कोणती दक्षता घ्यावी, याचे मार्गदर्शन पोलीस, तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मेळावे आयोजित करून मच्छीमारांना दिली आहे. प्रजासत्ताक दिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांचे चार गट भारतात पाठवले असून, त्यापैकी एक गट मुंबईत आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर ही सतर्कता घेण्यात आली आहे. रायगडची किनारपट्टी ही संवेदनशील असल्याने मच्छीमारांशी रायगड पोलिसांनी संवाद व संपर्क जाणीवपूर्वक वृद्धिंगत करून ही सागर रक्षक व्यवस्था निर्माण केल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली. च्कोकणातील किनारपट्टीतील सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम झाली असल्याची माहिती कोकण परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सागरी गस्तीकरीता पोलीस दलास देण्यात आलेल्या स्पिÞड बोट्स, नव्याने कार्यान्वित झालीली सागरी पोलीस ठाणी या बरोबरच पोलीस, तटरक्षक दल,नौदल, सिमा शुल्क विभाग आणि मत्स विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून स्थापन करण्यात आलेली ‘सागर रक्षक दले’ यांच्या माध्यमातून ही सागरी सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात आल्याचे गुप्ता यांनी पूढे सांगीतले. यावेळÞी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.शशिकांत महावरकर व अप्पर ुिजल्हा पोलीस अधिक्षक राजा पवार हे उपस्थित होते.बल्क एसएमएस सिस्टीम...च्मच्छीमारांच्या मोबाइल्सवर ‘बल्क एसएमएस सिस्टीम’द्वारे संबंधित जिल्हा पोलीस यंत्रणेकडून सातत्याने माहिती देण्यात येते. त्यात समुद्रात वा किनारी भागात कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास हे मच्छीमार तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास माहिती देत आहेत. अशी माहिती प्राप्त झाल्यावर त्याची तत्काळ खातरजमा तटरक्षक दल व नौदलाच्या गस्तीनौका व हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून करण्यात येते. च्जे सुरक्षा रक्षक ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा वापर करतात त्यांचे स्वतंत्र गट करून त्या प्रभावी माध्यमातूनदेखील थेट माहितीची देवाण-घेवाण करण्याचे काम सध्या रायगडमध्ये सुरू आहे. याव्यतिरिक्त मोबाइलवर एसएमएसद्वारे तर बोटींवरील रेडिओवर मच्छीमार बांधवांना उपयुक्त हवामानाची माहिती देण्यात येत आहे. मोबाइलमुळे समुद्रातील संबंधित सागरी सुरक्षा रक्षकाच्या भौगोलिक स्थानाची अचूक माहिती मिळत असून, आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा तेथे काही क्षणांत पोहोचणेदेखील शक्य होऊ शकेल.सर्वाधिक २ हजार १०० सागरी सुरक्षा रक्षक हे एकट्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरूड, पेण, दादर, वडखळ, पोयनाड, नागोठणे, महाड शहर, महाड ग्रामीण, गोरेगाव, रोहा, श्रीवर्धन, दिघी व म्हसळा या पोलीस ठाण्यांच्या किनारी भागातील आहेत. रायगडव्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५४ गावांतील ३४४, रत्नागिरीतील १३६ गावांतील ७३७, ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रांत १० गावांतील १३५ तर नव्याने स्थापित पालघर जिल्ह्यात १०० सागरी सुरक्षा रक्षक सज्ज झाले आहेत.