शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

किनारी वीजवाहिन्या भूमिगत करणार

By admin | Updated: June 10, 2016 03:29 IST

नैसर्गिक आपत्तीपूर्वी उपाययोजना करण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच वीजवाहिनी भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे.

वसई : नैसर्गिक आपत्तीपूर्वी उपाययोजना करण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच वीजवाहिनी भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे वसईकर ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीला यश आले आहे.वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गावात गेल्या कित्येक दिवसांपासून विजपुरवठा खंडीत होत आहे. जीवघेण्या उन्ह्याळ्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत विज पुवठा खंडीत होत असलमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कमी दाबाने पुरवठा होत असल्यामुळे उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे निर्मळ, भुर्इंगाव, गास, वाघोली, कळंब या गावांना नालासोपारा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सनसिटी उपकेंद्रातून करण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ वसईचे अधिक्षक अभियंता अरुण पापडकर यांना भेटले होते. १९७० साली उभारण्यात आलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. त्यावेळचे पोल, फिडर, ट्रान्सफार्मर, तारा, डिओ आज अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. या यंत्रणेने आजर्पंत अनेक ग्रामस्थांचे बळी घेतले आहेत. उच्च दाबाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तर त्यांच्या भाराने खांब वाकलेले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त दाब पडलमुळे ट्रान्सफार्मर वारंवार बंद पडत आहेत. आदि बाबी पापडकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्यात. नानभाट अटाळी आळी येथील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी तुस्कानो यांनी लावून धरली.त्यावर आपण स्वत: सर्व परिसरात पाहणी करू व आवश्यक त्या बाबींची युद्धपातळीवर दुरुस्ती करू.निर्मळ दोडती आळीत व नानाभाट अटाळी आळीत मोठ्या क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्यात येईल तसेच निर्मळ, भुईगांव, वाघोली, कळंबला सनसिटीतून पुरवठा करणत येईल अशी ग्वाही पापडकर यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)>अडीच किमीची मर्यादाएनआरसीएचए’ नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत समुद्र किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. अशी माहितीही पापडकर यांनी दिली.