शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

युती, आघाडीसाठी राजकीय पक्षांमध्ये खलबतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 18:33 IST

अकोला महापालिकेच्या निवडणूकीच्या पृष्ठभूमीवर राजकीस पक्षात कामाला लागले आहेत; मात्र युती, आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था कायम आहे.

आशिष गावंडेअकोला, दि. १८- महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असले, तरी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये युतीवरून व विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होते किंवा नाही, या मुद्यावर स्थानिक पातळीवर संभ्रमाचे चित्र आहे. नगरपालिका निवडणुकीत चारही प्रमुख राजकीय पक्षांनी घेतलेला निर्णय व पुढील वाटचाल पाहता कार्यकर्त्यांच्या संभ्रम वाढला आहे.फेब्रुवारी २0१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील. कधीकाळी केंद्रासह राज्यात व महापालिकेत सत्तासूत्रे सांभाळणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप-शिवसेना युतीने पूर्णपणे सफाया केला. आज रोजी केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत असून, राज्यात व महापालिकेत भाजप-सेनेची युती आहे. केंद्र व राज्यात पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ आघाडीची सत्ता टिकवून ठेवणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वायत्त संस्था ताब्यात घेण्याची संधी आहे. भाजप-शिवसेनेला विरोध करण्याची क्षमता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची अनेकांना जाण आहे, तर दुसरीकडे मोदी लाटेत स्वार होऊन केंद्रासह राज्यात सत्ता प्राप्त करणार्‍या भाजपच्या नेतृत्वाचा आत्मविश्‍वासही कमालीचा उंचावल्याचे चित्र आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची युती असली, तरी विरोधकांपेक्षा मित्रपक्ष शिवसेनेकडूनच भाजपवर सातत्याने प्रहार सुरू असतात. असे हल्ले भाजपकडून तेवढय़ाच ताकदीने परतवून लावले जातात. या सर्व राजकीय गदारोळात नगरपालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय दोन्ही राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक दिरंगाईने घेतल्याचे लक्षात येते. एकमेकांची ताकद सिद्ध करण्यासाठी ही रस्सीखेच सुरू असतानाच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याच्या मुद्यावरून परिस्थिती फारशी भिन्न नसल्याचे चित्र आहे. परिणामी, युती किंवा आघाडी न करता चारही राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी बाह्या वर खोचल्या आहेत.त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतदेखील युती व आघाडी होणार किंवा नाही, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावतो आहे. स्वबळावरच होतील लढतीसध्या राज्यात नगरपालिका, महापालिका व विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या प्रत्येक निवडणुकीत राजकीय समीकरणांची गोळाबेरीज करून युती किंवा आघाडी करायची किंवा नाही, याची चाचपणी सुरू असल्याचे दिसून येते. भारतीय जनता पार्टीचे प्रादेशिक राजकीय पक्षांबद्दलचे धोरण पाहता शिवसेना युतीबद्दल इच्छुक नसल्याचे बोलल्या जात आहे. त्याचे परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी आगामी मनपा निवडणुका स्वबळावरच लढल्या जातील, अशी चिन्हं दिसत आहेत. बिगुल वाजण्याची प्रतीक्षानगरपालिका निवडणुकीत युती असल्याची घोषणा भाजप-शिवसेनेने केली तोपर्यंत बराच उशीर झाला होता. इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्याची सबब पुढे करीत दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. हीच परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये असल्याचे चित्र आहे. अर्थातच, स्थानिक पातळीवर मनपा निवडणुकीसाठी युती किंवा आघाडी गृहीत न धरता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली. संबंधित पक्षांकडून केवळ बिगुल वाजण्याची प्रतीक्षा केली जात आहे. हा बिगुल वाजणार किंवा नाही, याबद्दल मात्र कायकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.