शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकार म्हणजे भरकटलेले जहाज

By admin | Updated: November 30, 2015 02:54 IST

राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार?

चिपळूण : राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार? राज्यात शेतकरी वाऱ्यावर आहे. मात्र हे सरकार म्हणजे भरकटलेले जहाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कृषीप्रधान राज्यात स्वतंत्र कृषीमंत्री व गृहमंत्री नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.चिपळूण येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार प्रतिनिधींच्या हल्लाबोल मेळाव्यासाठी ते येथे आले होते. राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. नऊवेळा केंद्रीय पथके आली परंतु, कोणतीही उपाययोजना नाही. जनावरे तडफडत आहेत. कोकणातही बागा होरपळल्या आहेत. फळबागांची उत्पादनक्षमता कमी झाली आहे. त्याची माहिती सरकारकडे नाही. राज्यात तूरडाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या सरकारने २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे ते म्हणाले.शिवसेनेची नौटंकी सुरू आहे. ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही त्यांना जाग आली नाही. आता मराठवाड्याचा दौरा ते करत आहेत. कृषीमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा अद्याप दौरा केलेला नाही, याकडे विखे यांनी लक्ष वेधले. कोकणचे पाणी मुंबईला नेण्याची गरज नाही. ठाणे व नाशिकमधून पाणी नेण्याची मान्यता आहे. चितळे समितीने सुचविलेले बंधारे बांधले तरी मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)