शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या आकडेवारीचा घोळ

By admin | Updated: January 29, 2016 04:22 IST

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोळसा मंत्रालयाचे मुख्य सचिव अनिल स्वरूप यांनी कोळसा खाणींच्या लिलावातून सरकारला २.०७ लाख कोटी रुपये महसूल

- सोपान पांढरीपांडे,  नागपूर

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोळसा मंत्रालयाचे मुख्य सचिव अनिल स्वरूप यांनी कोळसा खाणींच्या लिलावातून सरकारला २.०७ लाख कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याचा दावा केला होता. परंतु आता लोकमत माध्यम समूहाला माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या उत्तरात कोळसा मंत्रालयानेच आपला हा दावा नाकारला असून २९ कोळसा खाणींच्या लिलावातून केवळ १३९८ कोटी रुपये महसूल मिळाल्याचे कबूल केले आहे.मग २.०७ लाख कोटी आले कुठून?पंतप्रधान मोदी आणि कोळसा सचिव यांनी २.०७ लाख कोटी रुपयांचा आकडा कुठून आणला याचीही लोकमतने चौकशी केली. कोळशाचे भूमिगत साठे असलेल्या आठ राज्य सरकारांना दरवर्षी मिळणाऱ्या ‘रॉयल्टी’च्या अंदाजित महसुलाच्या आधारे हा भला मोठा दावा करण्यात उघड झाले. भारतात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या आठ राज्यांत कोळशांचे साठे आहेत. या राज्य सरकारांना लिलाव केलेल्या २९ खाणींमधून दरवर्षी ६२८४ कोटी रुपये रॉयल्टी मिळेल व खाणींचे आयुष्य ३० वर्षे असल्याने पुढील ३० वर्षांत एकूण रॉयल्टीपोटी १.८८ लाख रुपये व इतर तत्सम महसूल १९००० कोटी असे २.०७ लाख कोटी रुपये महसूल मिळेल असे हे ‘गणित’ होते.२०१२ साली तत्कालीन मुख्य लेखाकार विनोद राय यांनी कोळसा खाणींच्या वाटपातून सरकारला १.८६ लाख कोटी नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. केवळ २९ खाणींच्या लिलावातून त्यापेक्षा जास्त महसूल मिळाल्याचा दावाही पंतप्रधान मोदी व कोळसा सचिव अनिल स्वरूप यांनी केला होता. याच बरोबर कोळसा खाणींच्या लिलावामुळे वीज केंद्रांना कोळसा विनासायास मिळेल व वीज स्वस्त होऊन सामान्य जनतेला ९६९७१ कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष लाभ मिळेल, असा दावाही कोळसा मंत्रालयाने केला होता. परंतु माहितीच्या अधिकारातील उत्तरामुळे कोळसा खाणींचा महसूल २.०७ लाख कोटी रुपये नाही व अप्रत्यक्ष लाभही ९६९७१ कोटी रुपये मिळणार नाही, हे उघड झाले आहे.लोकमत समूहाचा अर्जलोकमत समूहाने कोळसा खाणींच्या लिलावासंबंधी एकूण १३ मुद्द्यांवर माहिती मागणारा अर्ज २ नोव्हेंबर २०१५ रोजी कोळसा मंत्रालयाकडे सादर केला होता. या अर्जाला मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी किशोर चौधरी यांनी २२ डिसेंबर २०१५ रोजी मुद्देसूद उत्तर दिले आहे.कोळसा मंत्रालयाचे उत्तरलोकमत समूहाने आपल्या अर्जात सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली रद्द केलेल्या २०४ कोळसा खाणींपैकी किती खाणींचा सरकारने लिलाव केला व त्यापासून २०१४-१५मध्ये सरकारला किती महसूल मिळाला, असा नेमका प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना कोळसा मंत्रालयाने २०१४-१५ या वर्षात २९ कोळसा खाणींचा लिलाव केला असून त्यापासून १३९८ कोटी रुपये महसूल मिळाल्याचे कबूल केले आहे.