शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मिती-वेकोलि उभारणार कोल वॉशरी

By admin | Updated: March 2, 2016 03:28 IST

वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महानिर्मिती आणि वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. (वेकोलि) यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात ४ कोल वॉशरी उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे

मुंबई : वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा धुण्यासाठी महानिर्मिती आणि वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. (वेकोलि) यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात ४ कोल वॉशरी उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या कोल वॉशरीमुळे महानिर्मितीच्या कोळशाची होणारी हानी व दूरच्या खाणीतील कोळशाच्या वाहतुकीचा खर्च वाचणार असून दरवर्षी ४२१ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. खासगी कोल वॉशरीमध्ये होणारी कोळशाची चोरी व दुय्यम दर्जाचा कोळसा यावरून मागील काळात महानिर्मिती आणि वेकोलि यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.विदर्भातील वीजनिर्मिती प्रकल्पांना लागणारा संपूर्ण कोळसा पुरविण्यास तयार असल्याचे वेकोलिचे प्रबंधक संचालक आर. आर. मिश्र यांनी सांगितले. तसेच यंदा ३० दशलक्ष टन कोळसा पुरविण्याची आमची तयारी असून दरवर्षी त्यात ५ दशलक्ष टन कोळशाची भर पडेल, असेही त्यांनी सांगितले. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानदी खदानीतून कोळसा खरेदी बंद करून वेकोलिचा कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महानदी खदानीतून आणल्या जाणाऱ्या कोळशाच्या वाहतूक खर्चात कपात होईल. तसेच चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी या वीजनिर्मिती केंद्रांना बेल्टवर कोळसापुरवठा व्हावा यासाठी लागणारे तीन बेल्ट सहा महिन्यांत तयार करण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी या वेळी दिल्या. नागपूरनजीकच्या महानिर्मितीच्या सर्व वीजनिर्मिती केंद्रांना वेकोलिकडे उपलब्ध असलेले पाणी नि:शुल्क देण्यास वेकोलि तयार आहे. नागपूर विभागात वेकोलिकडे ६ कोटी गॅलन पाणी दररोज उपलब्ध असते. आगामी काळात पेंचचे पाणी बंद होण्याची शक्यता लक्षात घेता, वेकोलिचे नि:शुल्क मिळणारे पाणी वापरण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी केल्या. खापरखेडा केंद्राला भानेगाव शिंगोरी येथील पाणीही वीजनिर्मितीसाठी वापरण्यास सांगण्यात आले. चंद्रपूर, खापरखेडा आणि कोराडी या तीनही वीजनिर्मिती केंद्रांना वेकोलि आपले पाणी देणार आहे. (प्रतिनिधी)