शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दूरदर्शन आणि खासगी न्यूज चॅनेल्सवर 'नीट'चे कोचिंग

By admin | Updated: May 14, 2016 20:06 IST

नीट परिक्षेला बसलेल्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.

ऑनलाइन लोकमत 
 
मुंबई दि. १४ – नीट परिक्षेला बसलेल्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून महाराष्ट्र सरकाराच्या आग्रहाखातर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी देशातील सर्व राज्यांमधील आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांची सोमवारी १६ मे रोजी नवी दिल्लीत बैठक बोलविली आहे. 
 
या बैठकीत आपण उपस्थित राहणार असून सर्वोच्च न्यायालयाने नीट संदर्भात दिलेल्या निकालानंतर एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्य़ांसाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतील,  तसेच यांसदर्भात केंद्र सरकारच्या वतीने अधिसूचना  काढता येऊ शकतो काय याचाही विचार सर्व मंत्र्यांच्या बैठकीत करण्यात येईल. 
 
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी होणा-या नीट परिक्षेची महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दूरदर्शन, खासगी न्यूजचॅनेल, इंटरनेट अथवा युट्युब मार्फत प्रथितयश शिक्षणतज्ज्ञाचे विशेष कोचिंग प्रसारित करण्याचा कार्यक्रम आखण्यात येत असून येत्या १९ मे पासून हे प्रसारण सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 
महाराष्ट्र सरकारची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच नीट संदर्भात केंद्र सरकारला अधिसूचना  काढता येऊ शकतो वा नाही, अधिसूचना  काढल्यास त्याबाबतचे कायदेशीर मुद्दे आदी सर्व मुद्द्यांचा विचारविमर्श करण्यात येणार असल्याचे सांगतानाच श्री. विनोद तावडे म्हणाले की, २४ जुलै रोजी होणा-या नीट परिक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे योग्य पध्दतीने कोचिंग होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विशेष प्रशिक्षण देण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे. 
 
दूरदर्शन आणि खासगी न्यूज चॅनेल्स वर विशिष्ट वेळेत दर दिवशी १ तास हे कोचिंग करण्यात येईल. या एका तासात दोन विषय प्रत्येकी अर्धा तास शिकविण्यात येतील. या प्रशिक्षणासाठी काही चॅन्ल्सनी कोणाताही आर्थिक मोबदला न घेता या प्रसारणाची तयारी दर्शविली आहे. वेबसाईटच्या माध्यमातूनही हे प्रशिक्षण देण्यात येईल.
 
त्याचप्रमाणे या कोचिंगचे विभागाच्या वतीने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येईल. नीट परिक्षेचा अभ्यास कसा असेल, परिक्षेची पूर्व तयारी कोणत्या पध्दतीने करायची याचे कोचिंग विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
नीट साठी सरकार ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या बातमीमुळे खासगी कोचिंग क्लास चालकांचे धाबे दणाणले आहेत. म्हणून सरकारी कोचिंग एचएससी बोर्डाच्या शिक्षण तज्ज्ञांमार्फत देण्यात येईल असा अपप्रचार त्यांनी  सुरु केला आहे. परंतु राज्याचे विशेष कोचिंग नक्कीच प्रभावी असेल असा विश्वास व्यक्त करतानाच श्री. तावडे यांनी सांगितले की, हे प्रशिक्षण सहा दिवस चालणार असून सातव्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार असून त्यांच्या प्रश्नांना शिक्षणतज्ज्ञांमार्फत उत्तरे दिली जातील.
 
महाराष्ट्र सरकार नीट परिक्षेसाठी बसणा-या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेरपर्यंत लढा देणार आहे. प्रसंगी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीने राष्ट्रपतींची भेट घेतली जाईल, हा विषय त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल आणि यामधून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.