शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता : राज्यपाल विद्यासागर राव, सहकार पुरस्काराचे सोलापूरात वितरण

By admin | Updated: April 26, 2017 17:35 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. २६ :- सहकार क्षेत्रापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता असून सहकारी संस्थांचे व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली.राज्य शासनाच्या सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्काराचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. जुळे सोलापूर येथील अंबर मैदानावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, ह्य सहकार चळवळ देशासाठी वरदान ठरेल, असे भाकित महात्मा गांधी यांनी केले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु सहकार चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. देशात सहा लाख सहकारी संस्था असून महाराष्ट्रात दोन लाखांवर संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या ठेवी आणि भांडवल फार मोठे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून साडेचार लाख लोकांना रोजगार मिळाला आहे़सहकार चळवळीने राज्याच्या सर्वसमावेशक, सामाजिक आणि आर्थिंक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे, असे नमूद करुन राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, केवळ कृषी पतपुरवठ्यापुरती मयार्दीत असणारी सहकार चळवळ आज बँकींग, पतसंस्था, साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, मत्स्य उत्पादन, पणन, अन्नपक्रिया, वस्त्रोद्योग, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात विस्तारली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्येही योगदान दिले आहे.राज्य शासनाने अलिकडच्या काळात सहकार चळवळीच्या विकासासाठी काही ठोस निर्णय घेतले आहेत. सहकार विभागाने सेवा हमी हक्क कायद्याखाली पाच सेवांचा समावेश केल्याबद्दल सहकार विभाग कौतुकास पात्र आहे, असेही राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, ग्रामीण भागाशी सर्वाधिक जोडल्या गेलेल्या सहकार क्षेत्राची सध्याची व्यवस्था कठीण आहे. सहकार क्षेत्र स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार क्षेत्रात रुग्णालये सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन नीट व्हावे आणि ही चळवळ अधिक मजबूत व्हावी यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सहकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 38 संस्थांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, सहकार आयुक्त व निबंधक, सह.संस्था संभाजी कडू - पाटील, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.