शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँंकांना अडीच टक्के परतावा

By admin | Updated: August 9, 2014 01:26 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतक:यांच्या पीक कर्ज वाटपावर जवळपास 4 ते 5 टक्के व्याजदराचे नुकसान सहन करावे लागत आहे.

दिगंबर जवादे - गडचिरोली
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतक:यांच्या पीक कर्ज वाटपावर जवळपास 4 ते 5 टक्के व्याजदराचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे व्याज परताव्याची रक्कम वाढवून देण्यात यावी अशी मागणी बँकांच्या मार्फतीने मागील अनेक वर्षापासून केली जात होती. आता राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना अडीच टक्के दराने प्रत्येक वर्षी व्याज परतावा देण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनाही मदत केली जाणार आहे. दोन्हीसाठी शासनाने सुमारे 231 कोटी रुपयांचे अर्थसहाय मंजूर केले आहे. 
 राज्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांचा शाखा विस्तार जास्त आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांचे सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक बँक खाते असून, आर्थिक व्यवहारही सहकारी बँकेच्या मार्फतीने करतात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जवळपास 1क् ते 12 टक्के दराने कर्ज वाटप करतात. मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतक:यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. परिणामी बँकेला जवळपास 6 ते 8 टक्के व्याज दरावर पाणी सोडावे लागत आहे. 
बँकांना पीककर्ज वाटपात होणारा तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी बँकांनी केलेल्या पीककर्ज पुरवठय़ाच्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 1.75 टक्के किंवा 1.25 टक्के 
दराने शासनाकडून व्याज परतावा देण्यात येत होता. मात्र एवढी रक्कम पुरेशी नसल्याने त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी राज्य शासनाकडे केली होती. 
बँकांच्या मागणीनुसार शासनाने व्याज परताव्याच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार आता सर्व बँकांना अडीच टक्के दराने व्याज परतावा देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 136 कोटी रूपये एवढे वाढीव अर्थसहाय मंजूर केले आहे. या मदतीमुळे बँकांचा तोटा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.