आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल. लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार घेण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी आलेल्या सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असा दावा केला. ते म्हणाले, सर्व्हर डाऊन आणि अन्य कारणामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन कर्जमाफीच्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सहकार आणि महसूल प्रशासनावर छाननीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर चावडीवाचन घेतले जाईल. निकषात न बसणाºया खातेदारांना पुरेसे पुरावे न मिळाल्यास यादीतून वगळले जाईल. तसेच अपुरी माहिती असेल अशा खातेदारांचे पुरावे, माहिती त्यातून उपलब्ध होईल. चावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीत याचीही काळजी घेतली जाईल, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले. यामुळे कर्जप्रकरणात पारदर्शिका येईल.------------------------सतर्क राहण्याचे आवाहनच्शेतकºयांच्या नावे सोसायटीचे चेअरमन आणि सचिवांनी कर्ज काढले अशा शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरून देऊ नयेत. यासंदर्भातील माहिती सहकार विभागाला द्यावी. कर्जाची रक्कम शेतकºयांनी जमा केल्यानंतर ती बँक खात्यात न भरता परस्पर वापरली असेल अथवा बेबाक दाखले देऊन शेतकºयांची बोळवण केली असेल अशा प्रकरणांची माहिती जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी स्वरुपात द्यावी किंवा चावडी वाचनात पुरवण्यात यावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकºयांनी सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.
कर्जमाफीत खोटी माहिती आढळल्यास गुन्हे नोंदवणार : सहकारमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:56 IST
कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल.
कर्जमाफीत खोटी माहिती आढळल्यास गुन्हे नोंदवणार : सहकारमंत्री
ठळक मुद्देचावडी वाचनामुळे कर्जमाफीसाठी पात्र असणारे शेतकरी वंचित राहणार नाहीतदिवाळीपूर्वी शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमालाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी चावडी वाचनाचा आधार