पुणो : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रुग्णालयात जाऊन साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे. पी. वासवानी यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. या वेळी त्यांनी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दादा वासवानी यांचा आज वाढदिवस असल्याने मिशनमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या कार्यक्रमाला दादा वासवानी यांनी उपस्थिती लावली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे दादा वासवानी यांना गेल्या आठवडय़ात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. वाढदिवसानिमित्त वासवानी मिशनमध्ये सत्संग, कीर्तन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)