शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

 ...अन् आम्ही सुखरूप बचावलो!, मुख्यमंत्र्यांनी कथन केला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा वृत्तान्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:49 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडच्या काळात दोन हेलिकॉप्टर अपघातांतून थोडक्यात सुखरूप बचावले. यातील अलिबाग अपघाताची तर फारशी माहिती समोर आली नाही

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडच्या काळात दोन हेलिकॉप्टर अपघातांतून थोडक्यात सुखरूप बचावले. यातील अलिबाग अपघाताची तर फारशी माहिती समोर आली नाही. बुधवारी, प्रथमच स्वत: मुख्यमंत्र्यांनी या अपघाताचा स्वानुभव कथन केला. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून या अपघाताचा थरार ऐकताना विधान परिषदेत विलक्षण शांतता पसरली होती.  मुख्यमंत्री म्हणाले, हेलिकॉप्टर पूर्ण बंद झाल्यावर त्यातून उतरण्याची सूचना को-पायलट देत असतो; परंतु अलिबाग येथील हेलिपॅडवर उतरलो, तेंव्हा हेलिकॉप्टर बंद होण्यापूर्वीच आम्हाला खाली उतरण्याची सूचना देण्यात आली. कार्यक्रमाच्या गडबडीत किंवा सजग नसल्यामुळे तेंव्हा आमच्या लक्षात आले नाही. परतीच्या वेळीही  तसेच घडले. एरवी हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर इंजिन सुरू केले जाते. परंतु, मी आणि विनोद तावडे तिथे पोहोचण्याआधीच हेलिकॉप्टर सुरू करण्यात आले होते. त्यातही समोरून लोक येत असल्याचे पाहून पायलटने हेलिकॉप्टर वर नेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते सरळ खाली आले! सुदैवाने दरवाजा बंद असल्याने  आम्ही आत जाऊ शकलो नाही. हा सारा प्रकार अनाकलनीय  होता. या प्रवासासाठी विमान प्राधिकरणाने मान्यता दिलेलेच हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. एका अनुभवी पायलटच्या हातून हे घडावे, हे अकल्पित होते. प्रसंगावधान नसते राखले तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.  राज्यभरातील हेलिपॅडचे आॅडिटलातूर जिल्ह्यात निलंगा तसेच रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेची एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन बोर्डर् (एएआयबी) चौकशी करत आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाई. शिवाय, हेलिकॉप्टर दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने हेलिपॅड लोकेशन पॉलिसी तयार केली असून, यापुढे या धोरणानुसारच हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच राज्यभरातील सर्व जुन्या हेलिपॅडचे आॅडिट करण्यात येणार आहे. शिवाय अतिविशिष्ट व महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसंदर्भात सुनिश्चित कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न विचारला होता.