शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

“स्वतःच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी यांची लढाई”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:23 IST

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.

CM Devendra Fadnavis News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो की, त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहे, त्यांना त्यांच्या मालकीची खाण देण्याचा निर्णय झाला. त्यातून आपल्या महाजेनकोला छत्तीसगड राज्यातील गरे पाल्मा ही खाण प्राप्त झाली आपण त्याचा एमडीओ केला. सगळे अडथळे पार करून बॉक्स कटिंग झाले आणि पहिला खेप या ठिकाणी आलेली आहे. यात सगळ्यात महत्त्वाचे आहे की, आता आपले कोळसा करिताच अवलंबित्व कमी होणार आहे. दुसरे या दुसर्‍याचा कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोळसा मिळतो आहे, आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी आम्ही याची सुरुवात केली, याला सहा सात वर्ष लागली. कोळशाची कुठलीही कमतरता आपल्याला पडणार नाही. पुढच्या काळात या कोळशामुळे वीज दर कमी करण्यात अजून यश येईल. आज कोळसा मिळतो तो २८००,२९०० किंवा ३२०० जेसीव्हीचा कोळसा आहे, थेट ४३०० जेसीव्हीचा कोळसा मिळाला, तर याचा परिणाम खूप मोठा होणार आहे. त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचा त्यापेक्षा जेसीव्ही वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर कमी होणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

स्वतःच्या अस्तित्वासाठी राहुल गांधी यांची लढाई

राहुल गांधीची लढाई ही केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांची लढाई ही फक्त त्यांचा सातत्याने होत असलेल्या पराभवातून आपले नेतृत्वाला कसं वाचवायचे, यासाठी आहे. आज काँग्रेस पक्षात अंतर्गत मोठ्या प्रमाणात हे आम्हाला जिंकून आणू शकत नाही, यांना हटवलं जावे, असा माहोल आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी ते असे बोलत असतात, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली. 

दरम्यान, आता तीन महत्त्वाचे कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. देशात सात सुरू आहेत. हे प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर त्यातून आपल्याला काही गोष्टी मिळतील, त्या आधारावर इतर ठिकाणी जिथे आपल्याला कोळशाचे साठे वापरता आले नाही, तिथे याच पद्धतीने करता येईल का याची माहिती आपल्याला मिळेल. लोड शेडिंग कुठेही नाही. आपण आता ७० टक्के शेतकऱ्यांना दिवसा पावर देणे सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's fight for survival: Fadnavis's sarcastic criticism.

Web Summary : CM Fadnavis lauded Modi's coal mine allocation to Maharashtra, boosting power generation. He criticized Rahul Gandhi, calling his fight a struggle for political survival amidst Congress party turmoil. Three coal gasification projects have commenced, and 70% of farmers now receive daytime power.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी