शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांमध्ये गोंधळ

By admin | Updated: February 17, 2015 01:33 IST

सन २०००च्या कालबाह्य परिपत्रकानुसार नियुक्त्या केल्या जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलातील खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांबाबत संभ्रम आणि गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. सन २०००च्या कालबाह्य परिपत्रकानुसार नियुक्त्या केल्या जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. राज्य पोलीस दलात फौजदारांच्या खात्यांतर्गत परीक्षेद्वारे जागा भरल्या गेल्या. मात्र त्यात नियुक्त्या देताना गुणवत्तेला मूठमाती दिली गेली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ सेवाज्येष्ठता नाही म्हणून डावलले गेले तर दुसरीकडे अनुत्तीर्ण उमेदवारांना नियमबाह्यरीत्या ग्रेस देऊन उत्तीर्ण दाखवीत नियुक्त्या दिल्या गेल्या.या नियुक्त्यांसाठी कालबाह्य परिपत्रकाचा आधार घेतल्याचा उत्तीर्ण, परंतु फौजदार नियुक्तीपासून वंचित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे. सन २०००मध्ये शिपाई हा किमान फौजदार व्हावा आणि फौजदार हा अपर अधीक्षकापर्यंत बढतीने जावा, अशी तरतूद करणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यासाठी २ हजार २४२ मूळ पदेही गोठविण्यात आली होती. वास्तविक हे परिपत्रक केव्हाच कालबाह्य झाले. मात्र त्यानंतरही या परिपत्रकानुसारच खात्यांतर्गत फौजदारांना नियुक्त्या दिल्या जातात. एकीकडे सेवानिवृत्तीवर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार म्हणून नियुक्ती देण्यास तरुण पोलिसांचा विरोध आहे. अनुत्तीर्ण, वरपास झालेल्यांना नियुक्ती कशासाठी, असा त्यांचा सवाल आहे. सेवाज्येष्ठतेच्या निकषामुळे उत्तीर्ण झालेल्यांवर अन्याय होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे शासनाच्या नियमानुसार आम्हा निवृत्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मान म्हणून फौजदारपदी नियुक्ती देण्यात यावी, असा सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे.फौजदारांच्या या नियुक्त्यांवरून पोलीस दलातच गुणवत्ताप्राप्त आणि सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचारी असे दोन गट पडल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयाचे निर्देशखात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात तीन ते चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर ५ फेब्रुवारी रोजी एकत्र सुनावणीअंती निर्णय देताना न्यायालयाने नियम आणि उपनियमांद्वारे निर्णय घेण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ३ महिन्यांच्या नियुक्त्याही रखडल्याराज्यात फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी १८०० कर्मचाऱ्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या. त्यातील कित्येक जण सेवानिवृत्त झाले. मात्र या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. परीक्षा उत्तीर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या. नंतर त्यांना पूर्ववत ठेवण्यात आले. जिल्ह्याबाहेर ९० दिवसांसाठी नियुक्तीचाही प्रस्ताव होता. त्यासाठी याद्या मागितल्या गेल्या. मात्र एक ते दीड वर्षापासून या याद्या प्रलंबित आहेत.