ठाणे : ठाण्यात क्लस्टर राबवणे ही सरकारची जबाबदारी असून सरकार त्यापासून मागे हटणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सादर केला असून याची अधिसूचना कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच जारी होईल, असा विश्वास त्यांनी राज्य शासनाच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.सरकारच्या डिजिटल लॉकर योजनेत १४ हजार लॉकर उघडून जिल्ह्याने राज्यात प्रथम क्र मांक पटकावल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्याचे भाजीपाला क्षेत्र वाढून ४ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. डीम्ड कनव्हेयन्स अदालत, आठवडी बाजारसारखे उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. पाच हजारांच्यावर वनहक्क दावे मंजूर करून आदिवासींना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गासोबतच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाला एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. तसेच, कल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रोलाही मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. तसेच माणकोली-मोटागाव खाडीपुल, ठाणे बोरिवली टनेल, मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग अशा अनेक प्रकल्पांच्या प्रगतीचा उहापोह त्यांनी केली.यावेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ठाण्यात क्लस्टर राबविणारच-शिंदे
By admin | Updated: November 2, 2016 03:30 IST