शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

किरणोत्सवाला ढगांचा अडथळा

By admin | Updated: February 2, 2016 04:06 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली. पहिल्या दिवशी (रविवारी) सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हीच सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती, पण सूर्यकिरणे साडेपाच वाजेपर्यंत मंदिराच्या पश्चिमद्वार महाद्वाराला स्पर्श करून गायब झाली. मंगळवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये बाहेरगावांहून आलेल्या भाविकांची संख्या मोठी होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या किरणोत्सवात महाद्वार रोड ते रंकाळा टॉवर या रस्त्यावरील इमारती, मोबाइल टॉवर, जाहिराती फलक यांचा अडथळा येत होता. हे किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेला कळविले होते. त्यामुळे यातील काही अडथळे हटवण्यात आले होते. त्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी मंदिरात प्रवेश करत थेट अंबाबाई देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श केला. किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. तरीही साडेपाच वाजता मंदिराच्या पश्चिमद्वारापर्यंत सूर्यकिरणे पोहोचली. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे किरणातील घनताचे प्रमाण कमी असल्याने किरणोत्सव झाला नाही.ही सूर्यकिरणे सायंकाळी ६.१० वाजता देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, अशी माहिती प्रा. डॉ. एम.एम. कारंजकर यांनी दिली. या वेळी केआयटी कॉलेजचे प्रा. किशोर हिरासकर, चंद्रकांत परुळेकर यांच्यासह केआयटीचे विद्यार्थी, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)