शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कल्हेमधील रुग्णालय बंद

By admin | Updated: March 4, 2017 02:49 IST

रानसईसह इतर आदिवासींसाठी जिल्हा परिषदेने कर्नाळ्याजवळील कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र सुरू केले होते

नवी मुंबई : रानसईसह इतर आदिवासींसाठी जिल्हा परिषदेने कर्नाळ्याजवळील कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह व आरोग्य केंद्र सुरू केले होते. पण येथे डॉक्टर व कर्मचारीच उपलब्ध करून दिले नसल्याने केंद्र बंद आहे. रुग्णालयाचे बांधकामही मोडकळीस आले असून आदिवासी महिलांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. पनवेल व उरण तालुक्याचे झपाट्याने शहरीकरण होवू लागले असले तरी या परिसरातील आदिवासी नागरिक अद्याप दारिद्र्याशी झुंज देत आहेत. रानसई परिसरातील बंगल्याची वाडी, खोंडेवाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी, खेरकाठी, भुऱ्याची वाडी या सहा आदिवासी वाड्यांमधील समस्यांवर ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासन जागे झाले. या परिसरामधील नागरिकांना त्यांच्या गावामध्ये रेशनिंगचे धान्य वाटप सुरू झाले आहे. पाणी समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. गावामध्ये जाणाऱ्या रोडची स्थिती अद्याप बिकट असून आरोग्य हा सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींना प्राथमिक उपचार घेण्यासाठीही ७ ते १० किलोमीटर दूर जावे लागत आहे. गर्भवती महिलांना उपचारासाठी एकही सरकारी रुग्णालय जवळ नाही. यामुळे अनेक वेळा रुग्णालयात घेवून जात असताना वाटेमध्येच महिलांची प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने कल्हे गावामध्ये प्रसूतीगृह सुरू केले होते. आदिवासी महिला व नवजात अर्भकांचा मृत्यू होवू नये व त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने ही उपाययोजना केली होती. याशिवाय कल्हे गाव, त्या परिसरातील इतर आदिवासी पाडे आणि गावांनाही याचा लाभ होणार होता. पण दुर्दैवाने हे रुग्णालय सुरूच झालेले नाही. जिल्हा परिषदेने १९८६ - ८७ मध्ये बांधलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतीचा वापरच करण्यात येत नाही. यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी छपराला भगदाड पडले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीलाही टाळे आहे. यामुळे त्या इमारतीचेही खंडर होवू लागले आहे. आदिवासी नागरिकांसाठी कल्हे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह सुरू केले तर त्याचा लाभ सर्वच नागरिकांना होवू शकतो. यामुळे जिल्हा परिषदेने पुन्हा हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा. या ठिकाणी निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. आदिवासी पाड्यांमध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा प्रत्यक्ष पाड्यांवर ओपीडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी नागरिक करत आहेत. वैद्यकीय सुविधाच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी पेण किंवा पनवेलला घेवून जावे लागत आहे. (प्रतिनिधी)