शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संख्येअभावी ३५ शाळा बंद

By admin | Updated: July 12, 2017 01:56 IST

विद्यार्थी संख्येअभावी मराठी व इतर भाषिक अशा ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विद्यार्थी संख्येअभावी मराठी व इतर भाषिक अशा ३५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र या बंद पडलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालवण्यास देऊन त्यात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत होते. मात्र विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. या गळतीचा फटका ३५ शाळांना बसला आहे. शाळा बंद पडल्याने या शाळांमधून इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्याचे धोरण पालिका प्रशासनाने बनवले आहे. त्यानुसार या शाळा खाजगी संस्था चालवणार आहेत. शाळांमध्ये मुख्याध्यापक पालिकेचा व शिक्षक मात्र खाजगी संस्थांचे असणार आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना महापालिका शाळांप्रमाणे मोफत २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. नव्या धोरणानुसार गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे. गटनेत्यांच्या बैठकीत शाळांच्या खाजगीकरणाचा हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर करून घेतल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. >नि:शुल्क शिक्षणया ३५ शाळांमध्ये मुख्याध्यापक हा पालिकेचा असणार आहे. शिक्षकांचा पगार हा खासगी संस्था देणार आहे. त्यावर नियंत्रण हे पालिकेचे असेल. विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिले जाणार असल्यामुळे या शाळा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सभागृह नेता यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.>शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम उघड मराठी शाळा बंद होण्यास शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी केला आहे. मराठी नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. तरीही मराठीचा अट्टहास धरणाऱ्या शिवसेनेला मराठी भाषेच्या शाळा वाचवता आल्या नाहीत. शिवसेना प्रशासनाच्या हाताचे बाहुले बनले असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. मराठीचा आग्रह मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत या खासगी संस्थांतर्फे सुरु होणाऱ्या शाळा मराठी माध्यमाच्याच असाव्यात, असा आग्रह धरला आहे. पहारेकरीही नाराज : यापूर्वी आयबीच्या शाळांना पालिकेने वर्ग दिले होते. परंतु, याठिकाणी शालेय इमारतीच देत आहोत. त्यामुळे या शाळा संस्थांची संस्थाने होतील अशी भीती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांंनी व्यक्त केली. मुख्याध्यापक हा महापालिकेचा असेल. परंतु, त्यांच्या अखत्यारितील शिक्षक हा खासगी असल्याने त्या शिक्षकांवर मुख्याध्यापकाचे काय नियंत्रण राहील? याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.