शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आलेमावना राष्ट्रवादीची दारे बंद

By admin | Updated: December 25, 2015 03:45 IST

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला

राजू नायक, पुणेगोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकांशी वार्तालाप केला. त्यात चर्चिल आलेमाव यांना पक्षात घेण्यास आपण स्वत:च अनुकूल नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश देण्याची माझी इच्छा नाही. त्यांचे नावही खराब आहे!, अशा शब्दांत पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आलेमाव यांना पुन्हा पक्षात घेण्यास काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीच आलेमाव यांना राष्ट्रवादीची दिशा दाखवल्याची वदंता आहे. आलेमाव यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी आणि नावेली मतदारसंघातून विधानसभेत पुनर्प्रवेश करण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी फालेरो यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राजकीय विजनवासातून बाहेर येण्यासाठी मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळवण्याचे चर्चिल यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर आलेमाव यांनी गोव्यात कोणतेही स्थान नसलेल्या ‘तृणमूल काँग्रेस’मध्ये प्रवेश करून दक्षिण गोव्यातून उमेदवारी दाखल केली. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला अपशकुन करण्याचा हा डाव होता. आलेमाव यांनी आधीही त्यांच्या पक्षाला अडचणीत आणले असून त्यांचा हा पूर्वेतिहास माहीत असल्यानेच त्यांचा प्रवेश पवारांनी रोखला आहे.काँग्रेसशी आघाडीत स्वारस्यराष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील भवितव्य काय?, यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातही अनेक वर्षे राहिली आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता उपभोगता आली. मात्र, अलीकडील काळात काँग्रेसने राष्ट्रवादीशी फटकून राहण्याचे धोरण अवलंबिले असून परिणामी दोन्ही पक्षांना सत्ता गमवावी लागली. काँग्रेसशी असलेली आघाडी राखण्यात राष्ट्रवादीला स्वारस्य असून तेच देशाच्या आणि गोव्याच्याही हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.