शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क वाढीविरोधात सराफांचा बंद

By admin | Updated: March 3, 2016 01:28 IST

सोन्यावर एक टक्का उत्पादनशुल्क लादण्यात आल्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारी तीनपासून बेमुदत बंद पुकारला आहे.

पिंपरी : सोन्यावर एक टक्का उत्पादनशुल्क लादण्यात आल्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारी तीनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. जोपर्यंत हे अन्यायकारक शुल्क रद्द करण्यात येत नाही, तोपर्यंत हा बंद मागे घ्यायचा नाही, असा निर्धार सराफ व्यावसायिकांनी केला आहे. शहरातील सराफांनी मंगळवारी दुपारपासूनच दुकाने बंद ठेवली. पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनतर्फे या संदर्भात बैठकही घेण्यात आली. जोपर्यंत हे शुल्क रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहरातील सराफांनी हिंजवडी, वाकड, सांगवी, खडकी, दापोडी, भोसरी, नेहरुनगर, पिंपरी, चिंचवडगाव, चिखली, निगडी या भागात रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून जी सराफ दुकाने सुरू आहेत, त्यांना दुकाने बंद करण्याची अािण आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. पिंपरीतील शगुन चौकात या रॅलीची सांगता झाली. सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा, उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा, खजिनदार विमल जैन, सेक्रेटरी मनीष सोनिगरा, तेजपाल रांका आदी उपस्थित होते. दोन लाखांहून अधिक कि मतीचे दागिने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती हा निर्णय सरकाने यापूर्वीच घेतला आहे. त्याबाबत व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या अर्थसंकल्पात हा नियम रद्द केला जाईल किंवा खरेदीची मर्यादा वाढविण्यात येईल, अशी व्यावसायिकांची अपेक्षा होती. परंतु, तशी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. याउलट एक टक्का उत्पादनशुल्क लादण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट आहे. सर्व सराफ व्यावसायिकांनी या अन्यायकारक निर्णयाविरोधात निर्णायक लढा द्यायचे ठरवले आहे. पुढील रूपरेषा लवकरच निश्चित केली जाईल, असे सराफांनी सांगितले. अर्थमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सराफ असोसिएशनचे शिष्टमंडळ गेले आहे. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरेल, असे अध्यक्ष सोनिगरा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)