शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील विनापरवानगी खेळणी त्वरित बंद करा

By admin | Updated: November 19, 2016 03:16 IST

शिवाजी महाराज उद्यानात अल्ताफ हनिफ डांगे हे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणा व इतर खेळणी लावून व्यवसाय करीत आहेत

नेरळ : माथेरान येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात अल्ताफ हनिफ डांगे हे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणा व इतर खेळणी लावून व्यवसाय करीत आहेत; परंतु उद्यानात खेळणी लावण्याची मुदत ३० आॅक्टोबर रोजी संपली असतानादेखील या उद्यानात खेळणी लावून व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे या व्यावसायिकावर राजकीय वरदहस्त आल्याने हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप माथेरान नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ही विनापरवानगी खेळणी त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. माथेरानची विशेष आकर्षण असणारी मिनीट्रेन सध्या बंद असल्याने माथेरानच्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हे माथेराला येऊन येथील उद्यानातील खेळांचा आनंद घेत असतात. माथेरानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नगरपरिषदेच्यावतीने अनेक खेळणी लावण्यात आली आहेत. त्याच्याच शेजारी अल्ताफ या व्यावसायिकाने नगरपरिषदेच्या निविदेनुसार खेळणी लावून व्यवसाय करीत आहेत; परंतु या निविदेची मुदत संपून १० दिवस उलटले, तरी हा व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे या व्यवसायावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात असून पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.सध्या माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अनेक नेते प्रचारात गुंग असल्याचे दिसत आहे. निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली असताना निविदा काढता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत शिवाजी महाराज उद्यानातील खेळणी व्यवसाय बंद करावा, अशी मागणी माथेरानमधील नागरिक राजेंद्र गंगाराम कदम आणि अकबर कासम मुजावर यांनी नगरपालिकेकडे ३ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. या व्यावसायिकावर कारवाई न झाल्यास आम्हीही या उद्यानातील अन्य जागेवर खेळणी लावून व्यवसाय करू, असा इशारा राजेंद्र कदम आणि अकबर मुजावर या ग्रामस्थांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)