अकोला : कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली असून, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गुरुवारी सकाळी ८.३0 वाजता संपलेल्या चोवीस तासात राज्यातील हवामान कोरडे होते. राज्यात वेगवेगळय़ा विभागातील हवामान संमिश्र असून, येत्या आठवड्यात पश्चिम विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे येथील हवामानशास्त्र विभागाने गत चोवीस तासात राज्यात सर्वात कमी १२.0 अंश सेल्सिअस तापमान जळगाव येथे नोंदवले आहे.३१ जानेवारीपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ३0 जानेवारी रोजी पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल तापमान ३0 तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल ३0, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. गत चोवीस तासात राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव खान्देश येथे १२.0 नोंदवले असून, चंद्रपूर १२.१ आणि नाशिक येथे १२.६ एवढे किमान तापमान नोंदवले आहे. मुंबई (कुलाबा) येथे १९.६, सांताक्रुझ १५.८, अलिबाग १७.९, पणजी (गोवा) २0.४, डहाणू १५.९, भिरा १३.0, पुणे १३.३, कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १४.६, मालेगाव १५.0, सांगली १५.७, सातारा १४.0, सोलापूर १५.१, औरंगाबाद १४.४, परभणी १४.९, नांदेड १३.५, अकोला १५.४, अमरावती १७.८, बुलडाणा १४.0, ब्रह्मपुरी १६.१, नागपूर १३.७, वाशिम १८.0, वर्धा १५.0 तर यवतमाळ १३.४ किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे येथील जेष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी राज्यात हवामान कोरडे असून, पावसाचे कोणतेही चिन्ह नसल्याचे स्पष्ट करून येत्या आठवड्यात पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व अमरावती भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात हवामान कोरडे राहणार!
By admin | Updated: January 29, 2015 23:22 IST