शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नेत्रपेढ्या एका क्लिकवर...

By admin | Updated: June 9, 2016 00:51 IST

शासनस्तरावर ‘नेत्रपेढ्यां’चे केंद्रीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुणे : शासनस्तरावर ‘नेत्रपेढ्यां’चे केंद्रीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या माध्यमातून सर्व नेत्रपेढ्या एकमेकांशी आॅनलाइन पद्धतीने जोडल्या जाणार असून, नेत्रांची गरज आणि त्याची पूर्तता याची अधिकृत नोंद शासनदरबारी होणार आहे. त्यामुळे नेत्रदानाच्या चळवळीला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांत नेत्रदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून अनेक जण त्यासाठी पुढे येत आहेत. याशिवाय कुठल्या रुग्णालयाला कोणत्या अवयवाची गरज आहे, याची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे अवयवदानाच्या मोहिमेला म्हणावे तेवढे यश मिळू शकलेले नाही. नेत्रदानही त्याला अपवाद ठरलेले नाही. राज्यात अनेक नेत्रपेढ्या कार्यरत असून, त्यांच्याकडे मृत व्यक्तींचे डोळे दान केले जातात. एखाद्या नेत्रपेढीला महिन्याला १० रुग्णांचे नेत्र मिळत असतील, मात्र तेवढी त्यांना गरज नसेल तर त्यांना दुसऱ्यांना देणे ते सहज शक्य आहे. या सर्व नेत्रपेढ्यांचे केंद्रीकरण करून त्या इंटरनेटद्वारे आॅनलाइन जोडण्याचा उपक्रम शासनाकडून हाती घेण्यात आलेला आहे. याच्या पुढच्या टप्प्यात नेत्ररोपण करणारी रुग्णालयेही या संगणक प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत.