वरोरा : शेतजमिनीच्या सातबारावरील बहिणीचे नाव कमी करण्याकरिता आठ हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथील नायब तहसीलदार व त्याच्या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पकडले. ए. एल. काहीलकर असे नायब तहसीलदार व महेश लोणकर असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. लाच स्वीकारताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यामध्ये नायब तहसीलदार ए. एल. काहीलकर याने मदत केल्याने त्यालाही अटक करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नायब तहसीलदारासह लिपिकाला अटक
By admin | Updated: September 2, 2015 01:01 IST