शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयात स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

By admin | Updated: May 19, 2016 03:04 IST

स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे

अलिबाग : स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये २१ मेपर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात आपल्याच जिल्हा परिषदेपासून करण्यासाठी बुधवारी स्वच्छतेची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली. रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात याबाबतचा कार्यक्रम पार पडला. साळुंखे यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले.केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता पंधरवड्याच्या कालावधीमध्ये सर्व सरकारी इमारत, कार्यालये स्वच्छ करण्यात येणार आहेत. २३ मे रोजी सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सामूहिकपणे स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे. २५ मेला अधिकारी आणि कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करायचा आहे, तर २६ मे रोजी सरकारी कार्यालयातील कागदपत्रांची नोंदणी करून ते व्यवस्थित ठेवून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावायची आहे. त्याचप्रमाणे २७ मेला सरकारी इमारत व इमारतीच्या परिसराची स्वच्छता करायची आहे. ३० मे रोजी सर्व कार्यालयातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच पाण्याची बचत करून अन्य लोकांनाही बचतीचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन साळुंखे यांनी केले.कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध उपाय सुचविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व स्वच्छता मिशनचे संवादतज्ज्ञ सुरेश पाटील यांनी केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी ए.के.जाधव, नंदकुमार गायकर, रविकिरण गायकवाड, नेहा जाधव यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.