शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात जेसीबी उतरवून सफाई सुरू

By admin | Updated: June 9, 2017 03:29 IST

नालेसफाईच्या कामातील फोलपणा बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पाहणीदौऱ्यात उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत केडीएमसीतर्फे सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामातील फोलपणा बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या पाहणीदौऱ्यात उघडकीस आला. यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना तंबी देत कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिले होते. अखेर, या तंबीनंतर प्रशासन कामाला लागले असून थेट नाल्यात जेसीबी उतरवून सफाईची कामे करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर अशा तीन टप्प्यांत नालेसफाईची कामे केली जातात. सध्या महापालिका हद्दीतील नाल्यांची संख्या ८९ च्या आसपास आहे. या नाल्यांच्या सफाईसाठी यंदा ३ कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. परंतु, ही कामे पूर्ण झालेली नसल्याचे बुधवारच्या महापौरांच्या दौऱ्यात आढळले. महापौरांनी या दौऱ्यात कल्याण शहरातील आधारवाडी, संतोषीमाता मंदिर रोड, जरीमरी, कोळसेवाडी, खडेगोळवली इत्यादी नाल्यांची पाहणी केली. या वेळी जरीमरी नाल्यात अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. खडेगोळवली नाल्याच्या ठिकाणी नाल्यातील गाळ कंत्राटदाराने काठावरच ठेवल्याचे दिसले. नालेसफाईची ही अपूर्णावस्थेतील कामे पाहता महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुख्यालयाची वाट धरण्याची नामुश्की ओढवली होती. विरोधकांची जोरदार टीकामहापौरांच्याच दौऱ्यात नालेसफाईच्या कामांमधील फोलपणा उघड झाल्याने विरोधकांनीही प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर खरपूस टीका करण्याची संधी सोडली नाही. चौफेर झालेल्या टीकेनंतर प्रशासनाच्या नालेसफाईने वेग घेतला आहे. खडेगोळवली नाल्यात गुरुवारी जेसीबी उतरवून नालेसफाई सुरू होती. या कामांमध्ये सातत्य राहावे, अशी अपेक्षा कल्याण-डोंबिवलीकरांकडून व्यक्त होत आहे.