शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

‘रॉक क्लायम्बिंग’साठीखदान ‘क्लीनिंग’ मोहीम

By admin | Updated: April 12, 2015 01:02 IST

कोणतीही शासकीय मदत न घेता येथील गिर्यारोहकांनी सलग दोन वर्षे स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याने भरलेली खदान मोकळी करून ‘रॉक क्लायम्बिंग’साठी खुली केली.

मिलिंद कांबळे ल्ल पिंपरी-चिंचवडकोणतीही शासकीय मदत न घेता येथील गिर्यारोहकांनी सलग दोन वर्षे स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याने भरलेली खदान मोकळी करून ‘रॉक क्लायम्बिंग’साठी खुली केली. येथील शाहूनगर भागात दगडाची एक बंद खाण कचरा, झुडपांनी व्यापली होती. गिर्यारोहक गणेश आढाव, साहिल शहा, बिपीन शहा, अक्षय बागडे यांच्यासह एव्हरेस्टवीर श्रीकृष्ण ढोकळे २०११मध्ये तेथे क्लायम्बिंगचा सराव करीत. तेथील कचऱ्यामुळे सर्वांचीच गैरसोय होई. अखेर या सर्व गिर्यारोहकांनी कंबर कसली अन् सलग दोन वर्षे स्वखर्चाने आणि श्रमदानातून १० ट्रक मावेल इतका कचरा येथून काढण्यात आला. बघता बघता खाणीतील चार एकर परिसर स्वच्छ झाला. खाणीच्या पालटलेल्या रूपामुळे येथे सरावासाठी येणाऱ्या मुला-मुलींची संख्या वाढली. नंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी खाणीत जिना, बसण्यासाठी बाक आणि दिव्यांची सोय करून दिली.एकूण २०० फूट लांबीचा कडा असून, त्याची उंची सुमारे २५ फूट आहे. याला ‘नरवीर तानाजी मालुसरे गिर्यारोहण सराव मैदान’ नाव देण्यात आले. पिंपरी-चिंचवड माउंटेनिंअरिंग संघटनेतर्फे ढोकळे तेथे मोफत प्रशिक्षण देतात. गिर्यारोहण या साहसी खेळामुळे व्यक्तिगत विकासाला चालना मिळते. संकटावर मात करण्याची मानसिक-शारीरिक क्षमता प्रबळ होते. पुढील वर्षी मुंबईत जागतिक स्पर्धा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील गिर्यारोहण मैदानावर मिळणारी सरावाची संधी नक्कीच उपयुक्त आहे. - श्रीकृष्ण ढोकळे