शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ, स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 13:26 IST

महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्तासोपान चढेल, असा आशावाद भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख आ.सुनील देशमुख यांनी रविवारी व्यक्त केला.

स्वच्छ, स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती !भाजपचे हमीपत्र : स्पष्ट बहुमताचा दावाअमरावती : महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्तासोपान चढेल, असा आशावाद भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख आ.सुनील देशमुख यांनी रविवारी व्यक्त केला. येथील पत्रकार भवनामध्ये देशमुख यांनी भाजपच्या विकासाचे हमीपत्र दिले. स्वच्छ ,स्मार्ट, भ्रष्टाचारमुक्त अमरावती हाच भाजपचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत भाजपने ७५ उमेदवार रिंंगणात उतरवले आहेत. भाजपने हमीपत्राच्या रूपात जाहिरनामा प्रकाशित केल्याचे सांगत आ. देशमुख यांनी महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शहराची छबी बिघडवल्याचा आरोप केला. शहरावर ‘गोल्डन गँग’ने निरंकुश राज्य केले, अशी टीका त्यांनी केली. पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासोबतच सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, हजारो हातांना रोजगार देणे, अमरावतीकरांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासह कचरामुक्त शहरासाठी भाजप वचनबध्द आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाने शहराचे रुप बकाल झाले आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावणारी सक्षम यंत्रणा नाही. त्याअनुषंगाने ‘योजनापूर्वक स्वच्छता’ हा प्राधान्याचा विषय राहील, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुरक स्वच्छ अमरावती वास्तवात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध राहिल. शहराची डासांपासून मुक्ती, प्रदूषणमुक्त अमरावती, विक्रमी वृक्षलागवडीला प्राधान्य हे पक्षाचे विकासाचे हमीपत्र असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला शहराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय आणि रीता मोकलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)दोषींना शासन करुशहरात विकासकामांच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींना निश्चित शासन करु,असेही भाजपच्या हमीपत्रात नमूद आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शीपणे चालविण्याचा संकल्प भाजपने मुद्रांकावर दिलेल्या अमरावतीकरांच्या जाहिरनाम्यातून सोडला आहे.