शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ मुंबई अभियान

By admin | Updated: March 2, 2017 02:07 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवली गेली.

मुंबई : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवली गेली. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली इ. राज्यात १४८ शहरांमध्ये सुमारे १,४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके व सुमारे २७२० कि. मी. लांबीचे शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बस स्थानके, रुग्णालये येथे राबविण्यात आले.या अभियानासाठी प्रतिष्ठानातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्याबाबत विनंती पत्रे दिली गेली. मुंबईतील महालक्ष्मी येथील आनंद निकेतन संस्था आणि परळ येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात २ हजारांहून अधिक सदस्य व नागरिक यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. या वेळी अधिष्ठाता डॉ. ए. एम पातुरकर यांनी सांगितले की, १३० वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या या विद्यालयात १ मार्च रोजी डॉ. नानासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १५ एकरच्या या परिसराचा २ हजारांहून अधिक सदस्यांनी दीड तास स्वच्छता करून कायापालट केला.पश्चिम उपनगरात सांताक्रुझ ते दहिसर या विभागात प्रतिष्ठानच्या वतीने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडोशी येथील नागरी निवारा परिषद क्रमांक ५ व ६ येथील अपना बाजार जंक्शन येथे या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ४०मधील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक सुहास वाडकर आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रभाग क्रमांक ४१चे अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़ या वेळी प्रभाग शाखाप्रमुख संदीप जाधव, नारायण पाटील आणि येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांताक्रुझ ते दहिसरदरम्यान, सरकारी कार्यालयात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत एकूण सरकारी कार्यालय ५६, एकूण मनुष्य बळ २,५५१, सफाई केलेले एकूण क्षेत्रफळ ३९९२४२.५३, एकूण जमा झालेला कचरा १५.२८५८ टन, तर रस्त्यावर केलेल्या साफसफाईत एकूण रस्त्यांची संख्या ३३७, रस्त्याची एकूण लांबी ४४२.३१, एकूण ३४.६९८ टन इतका कचरा रस्त्यावर जमा झाला. (प्रतिनिधी)