शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा बोजवारा

By admin | Updated: June 11, 2016 02:54 IST

पनवेल नगरपरिषदेच्या वतीने वैयक्तिक वापरासाठी स्वच्छतागृहे उभारणाऱ्या रहिवाशांना निधी उपलब्ध करून दिला होता

वैभव गायकर,

पनवेल- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पनवेल नगरपरिषदेच्या वतीने वैयक्तिक वापरासाठी स्वच्छतागृहे उभारणाऱ्या रहिवाशांना निधी उपलब्ध करून दिला होता. पनवेल परिसरातील अनेक रहिवाशांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेकडे निधीसाठी अर्ज केले होते. याअंतर्गत अनेकांनी स्वच्छतागृहांची बांधकामेही केली. परंतु या स्वच्छतागृहांना मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम रखडल्याने वापराविना ही स्वच्छतागृहे धूळखात पडून आहेत. एकूणच नगरपरिषदेच्या वेळकाढूपणामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा पनवेलमध्ये पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणाऱ्या नागरिकाला नगरपरिषदेच्या माध्यमातून २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. यातील ३ हजार नगरपरिषद, ५ हजार वित्त विभाग तर उर्वरित १२ हजार केंद्र शासनाकडून मिळणार आहे. शहराला हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्र माला पनवेल नगरपरिषदेने या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. याअंतर्गत नगरपरिषदेला अनेक अर्ज प्राप्त झाले. जवळपास ६०० पेक्षा अधिक लोकांनी या मोहिमेअंतर्गत स्वच्छतागृहांची बांधणी केली. परंतु यातील अनेक स्वच्छतागृहांना नगरपरिषदेकडून मलनि:सारण जोडण्या दिल्या गेल्या नाहीत. परिणामी ही स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. याकरिता नागरिक सातत्याने नगरपरिषदेत खेटे मारीत आहेत . आरोग्य विभाग संबंधित जबाबदारी बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगत आहे . मात्र बांधकाम विभागाकडे तक्रार करुन देखील या समस्येचे निवारण होत नाही. प्रभुआळीमधील रहिवासी सुप्रिया पडवळ यांनी महिनाभरापूर्वी स्वच्छतागृह उभारलेले आहे. मात्र वारंवार पत्रव्यवहार करुन देखील नगरपरिषदेचे अधिकारी त्यांच्या स्वच्छतागृहाला मलनि:सारण वाहिन्यांची जोडणी देत नाही. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत २0 हजार रूपयांचा निधी दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात माझ्या खात्यात केवळ ६००० रूपये इतकीच रक्कम जमा झाल्याचे पडवळ यांनी सांगितले. मलनि:सारण वाहिन्या जोडण्याचे काम लवकरच नगरपरिषदेकडे एकूण ५९८ स्वच्छतागृहे उभारणीचे लक्ष्य होते. ते लक्ष्य नगरपरिषदेने पूर्ण केले आहे. बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची जोडणी मलनि:सारण वाहिनीला करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये सोसायटीमधील स्वच्छतागृहांना आम्ही प्राधान्य देत आहोत. लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील उर्वरित स्वच्छतागृहांची जोडणी आम्ही करणार आहोत, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले आहे.