शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सुलेखनातून रेखाटला स्वच्छ भारत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2015 03:17 IST

गंगा नदीच्या घाटावर १०० फूट लांबीचा पेपर रोल अंथरला होता. एका बाजूने ‘हर हर गंगे’च्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव, तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई

बनारस : गंगा नदीच्या घाटावर १०० फूट लांबीचा पेपर रोल अंथरला होता. एका बाजूने ‘हर हर गंगे’च्या जयघोषात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव, तर दुसऱ्या बाजूने मनोहर देसाई ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा श्लोक म्हणत अक्षरलेखन करत होते. सूर्योदयाच्या साक्षीने जमलेले भाविक घाटावर रंगलेली अक्षर दंगल स्तीमित होऊन पाहत होते. बनारस विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘कलाक्षर’ या कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी संमेलनाचा रसिकांनी मनसोक्त आनंद घेतला. पालव-देसाई जोडीच्या अक्षरलेखन आणि टायपोग्राफीचा अनोखा सामना १०० फूट लांबीच्या कागदावर रंगला. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, शिक्षीत भारत’ असा संदेश त्यातून देण्यात आला. हे सारे चालू असताना सभोवताली जमलेले भाविक सूर्याचे मंत्र आणि आरती चढ्या आवाजात म्हणत होते. सूर्य जसजसा वर येऊ लागला, तसतशी अक्षरेदेखील खुलून दिसू लागली. या अनोख्या मैफिलीनंतर अच्युत पालव यांचा ‘बनारस सुबह’ या संस्थेतर्फे मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला.कॉम्प्युटरच्या जगात अक्षरलेखनाकडे जगाचा ओढा निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे. पॅरिस येथेदेखील एका नामवंत कंपनीने इंटिरियर करण्यासाठी जगातल्या सात लिपींची निवड केली आहे, ज्यात आपल्या देवनागरीचा समावेश आहे आणि त्यासाठीदेखील आपण केलेल्या कामाची निवड होणे हा अक्षरलेखनाचा सन्मान आहे.- अच्युत पालव, सुलेखनकार