शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशनचा आता व्हॉट्सअप नंबर

By admin | Updated: July 12, 2016 16:29 IST

स्वच्छ भारत मिशनच्या वाशिम जिल्हा कक्षाच्या वतीने 8975767749 हा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 12-  स्वच्छ भारत मिशनच्या वाशिम जिल्हा कक्षाच्या वतीने 8975767749 हा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला असुन याद्वारे स्वच्छतेविषयी चांगल्या उपक्रमांची आणि नागरीकांच्या तक्रारींचीही दखल तात्काळ घेतलीजाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कायर्कारी अधिकारी महेश पाटील यांनी दिली.जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनल गती देण्यासाठी मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्यात नवनवीन उपक्रमांना सुरुवात केली असुन हा लोकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या हेतुने स्वच्छ भारत मिशनचा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना हा नंबर पंचायत समितीच्या दशर्नीय भागात प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील स्वच्छतेबाबतच्या यशोगाथांची माहिती जिल्हा कक्षाला त्वरीत मिळावी आणि लोकांच्या या अभियानाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी या नंबरवर लेखी, छायाचित्र, रेकॉडिंग किंवा शुटींगच्या स्वरुपात टाकणे अपेक्षित आहे. या नंबरवर फोन न करता वरील स्वरुपातच नागरीकांनी संवाद करावा असे आवाहन महेश पाटील यांनी केले आहे.सेल्फी विथ शौचालय..आज ग्रामिण भागातही अ‍ॅण्ड्राईड मोबाईलचे फॅड एवढे वाढले आहे कि प्रत्येक घरी एखादा तरी असा मोबाईल पहायला मिळतो. त्यातच व्हॉटसअप मुळे संदेशाची देवाण-घेवाण खुपच जलद होत असल्याने हे माध्यम सर्व लोकांमध्ये पॉप्युलर झाले आहे. यामुळेच या माध्यमातुन लोकांना स्वच्छ भारत मिशनशी जोडुन घेण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुककरण्यासोबतच स्वच्छतेच्या या अभियानाशी संबंधित योग्य तक्रारीचीही दखल तात्काळ घेण्याचा प्रयत्न या माध्यमातुन करण्यात येणार आहे. लोकांनी शौचालय बांधुनही प्रोत्साहन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यास त्यांनी मोबाईल मध्ये शौचालयासोबत सेल्फी (फोटो) काढुन स्वच्छ भारत मिशनच्या व्हॉट्स्अप नंबरवर टाकल्यास त्याची जिल्हास्तरावर तात्काळ दखल घेण्यात येईल.