शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘बसगाड्या पाण्याऐवजी झाडूने स्वच्छ करा’

By admin | Updated: March 31, 2016 02:06 IST

राज्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळाने आगार, बसस्थानकांसह एसटी कर्मचाऱ्यांना पाणी जपून वापरण्याच्या

मुंबई : राज्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी एसटी महामंडळाने आगार, बसस्थानकांसह एसटी कर्मचाऱ्यांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, याचा फटका एसटीलाही बसला असून, बसगाड्या पाण्याऐवजी झाडूने स्वच्छ करण्याचे आदेशही दिले आहेत. महाराष्ट्रात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याची गरज लक्षात घेता, कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी अत्यंत कमी होत जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आदेश एसटी महामंडळाने सर्व आगार, बस स्थानके व इतर प्रशासकीय कार्यालयांना दिले आहेत. पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणविरहित ठेवण्यात यावेत, आगार कक्षेतील बसस्थानके, उपहारगृहे, प्रसाधनगृहे येथील पाण्याचे नळ सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेतली जावी. चालक-वाहक विश्रांतीगृहे व एसटी बसगाड्या धुलाई यंत्रे येथील पाणी साठविण्याच्या टाक्या दररोज तपासून, पाण्याची गळती होत नसल्याची खात्री करून देण्याच्या आदेशाचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे, पाण्याची कमतरता असेल, अशा ठिकाणी एसटी बसगाड्या स्वच्छ झाडून काढाव्यात आणि फिनेलसारख्या द्रावणाचा पुरेशा प्रमाणामध्ये वापर करण्याचे आदेशही एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)टँकरमधील पाण्याचा वापर पिण्यासाठीच कराकाही आगारांमध्ये टँकरनेही पाणी पुरवठा केला जातो. अशा ठिकाणी टँकरमधील पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच करण्याचे आवाहन केले आहे.