शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन बलात्काराचा खटला मुंबईत वर्ग

By admin | Updated: July 6, 2017 04:49 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नाशिकच्या अल्पवयीन मुलाला मुंबईच्या उमरखाडी बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देत, उच्च

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नाशिकच्या अल्पवयीन मुलाला मुंबईच्या उमरखाडी बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश  देत, उच्च न्यायालयाने त्याच्यावरील खटला नाशिकऐवजी मुंबईच्या किशोर न्याय परिषदेत (ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड) चालविण्याचा आदेश सरकारला दिला. ८ आॅक्टोबर २०१६ रोजी आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण नाशिक  जिल्ह्यात उमटले. सहा ते सात  दिवस नाशिकमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली व घर जाळण्यातही आले. मुलाच्या आई-वडिलांनी आधीच गावातून पळ काढला होता. नाशिकमधील ही स्थिती पाहून तेथील किशोर न्याय परिषदेने स्थानिक बाल सुधारगृह मुलासाठी सुरक्षित नसल्याने, या मुलाला मुंबईच्या उमरखाडी बाल सुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर मुलाला उमरखाडी बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. त्यानंतर, त्याच्या वडिलांनी हा खटला मुंबईतच चालविण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर न्या. अनिल मेनन यांच्यापुढे या अर्जावर सुनावणी होती.घटनेनंतर सोशल मीडियाद्वारे अनेक तिरस्कारपूर्ण संदेश व प्रतिक्रिया पाठविण्यात आल्या. त्यामुळे स्थिती अद्यापही  निवळलेली नाही. नाशिकच्या  किशोर न्याय परिषदेत खटला चालविल्यास मुलाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे या अर्ज नमूद करण्यात आले आहे, तर राज्य सरकारने ही बाब फेटाळली. नाशिकमधील तणावपूर्ण वातावण निवळले असून, आरोपीच्या जिवाला धोका नाही. नाशिकची कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असून, अर्जदाराने केलेला दावा खोटा आहे, असे सरकारने अर्जाला उत्तर देताना म्हटले. मात्र, न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला. सरकारचे म्हणणे  मान्य नाहीखुद्द नाशिकच्या किशोर न्याय परिषदेने अर्जदाराच्या जिवाला धोका असल्याचे आदेशात म्हटले आहे. अर्जदाराला घटनेनंतर तातडीने मुंबईच्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आल्याने, त्याच्या जिवाला आता धोका नाही, हे सरकारचे म्हणणे मान्य नाही, असे म्हणत, न्यायालयाने मुलाला उमरखाडी बाल सुधारगृहातच ठेवण्याचा व त्याच्यावरील खटला नाशिकमध्ये न चालविता, मुंबईत चालविण्याचा आदेश दिला.