शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक आठवड्याभरात

By admin | Updated: October 17, 2016 01:00 IST

शिक्षण मंडळातर्फे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जात होते

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जात होते. राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. परंतु, येत्या आठवड्याभरात मंडळातर्फे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना काही वर्षांपासून राज्य मंडळाकडून शाळा, महाविद्यालयांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजित वेळापत्रक दिले जात आहे. परंतु, पहिले सत्र संपत आले तरी अद्याप फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाने अद्याप प्रसिद्ध केले नाही. सोशल मीडियावर खोटे वेळापत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांनी कोणत्याही भूलथापांंना बळी पडू नये. लवकरच अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले.राज्यातील प्रस्तावित निवडणुका सर्वसाधारणपणे कोणत्या कालावधीत असतील, याबाबतची माहिती राज्य मंडळाला प्राप्त झाली आहे, असे नमूद करून म्हमाणे म्हणाले, मंडळाने कच्चे वेळापत्रक तयार केले असून सर्व विभागीय मंडळांकडून त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. स्थानिक पातळीवरील सुट्यांचा विचार करून त्यात काही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या आठवड्याभरात परीक्षेचे नियोजित वेळापत्रक आॅनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केले जाईल.(प्रतिनिधी)