शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थिनीचा रेल्वे अपघातात मृत्यू

By admin | Updated: March 2, 2016 03:16 IST

दहावीत शिकणाऱ्या बदलापुरातील प्रगती चव्हाण या विद्यार्थीनीचा सोमवारी म्हणजेच परीक्षेच्या आदल्यादिवशी रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.

बदलापूर : दहावीत शिकणाऱ्या बदलापुरातील प्रगती चव्हाण या विद्यार्थीनीचा सोमवारी म्हणजेच परीक्षेच्या आदल्यादिवशी रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या विद्यार्थीनीला अभ्यासाचा कोणताच ताण नव्हता असे तिच्या घरच्यांनीच स्पष्ट केले आहे. बदलापूर बॅरेज रोड परिसरातील महक अपार्टमेंटमध्ये ती राहणारी प्रगती ही याच परिसरातील खामकर विद्यालयात शिकत होती. मंगळवारी १० वीचा पहिला पेपर असल्याने ती आदल्या दिवशी क्लासमध्ये पेपर कसा लिहावा या संदर्भातील मार्गदर्शन शिबिराला जाण्यासाठी निघाली. घरातून सोमवारी दुपारी निघाल्यावर अवघ्या अर्धा तासात तिच्या घरच्यांना पोलिसांचा फोन आला. तिचा अपघात झाल्याचे त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला बदलापुरातील खाजगी आणि नंतर कल्याणमध्ये उपचारासाठी दाखल केले.मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचे रात्री ८.४५ वाजता निधन झाले. मंगळवारी दुपारी तिच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. मात्र तिचा अपघात झाला कसा हा संभ्रम अद्याप कायम आहे. प्रत्यक्ष पाहणाऱ्यांपैकी काहीजण प्रगती रेल्वेमधून पडल्याचे सांगत आहे. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार तिला लोकलची धडक बसली असे सांगत आहेत. (प्रतिनिधी)