शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेच्या संचालकांवर वसुलीचा दावा दाखल करणार

By admin | Updated: December 23, 2015 01:24 IST

राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आदेशाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत मुदतीतच पूर्ण केली जाईल.

नागपूर : राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आदेशाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत मुदतीतच पूर्ण केली जाईल. चौकशीसाठी अधिकचे सहा महिने सरकार घेणार नाही. तसेच दोषी संंचालकांकडून रक्कम वसूल करण्यासाठी कलम ९० नुसार दावा दाखल केला जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.अनिल गोटे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करीत राज्य सहकारी बँकेत १६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगत चौकशी अधिकाऱ्याला चौकशी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याकडे शासनाचे लक्ष वेधले. चौकशी समितीचे संचालकांना दोषी ठरविल्यानंंतरही जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार आयुक्त यांनी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून त्यानंतरही खोटे कारण सांगून अभिलेखे उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी वैधानिक लेखा परीक्षण व नाबार्डच्या वैधानिक तपासणी अहवालावर ७७ संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संंबंधितांनी दिलेला खुलासा तपासल्यानंतर नियम ७२ (३) नुसार संबंधितांवर नुकसान भरपाईचे आरोपपत्र १० सप्टेंबर २०१५ रोजी ठेवण्यात आले आहे. प्राधिकृत अधिकारी यांना चौकशीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बँकेकडून विलंबाने प्राप्त झाली. त्यामुळे या चौकशीत विलंब झाला, अशी कबुली देत विलंबाची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)