शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

न्यायालयात निवडणूक रद्द करण्यासाठी दावा

By admin | Updated: March 2, 2017 00:54 IST

पुणे महानगरपालिकेची २१ फेब्रुवारीची संपूर्ण निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी

पुणे : पुणे महानगरपालिकेची २१ फेब्रुवारीची संपूर्ण निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी, तोपर्यंत जाहीर करण्यात आलेल्यांना पालिकेची कर्तव्ये देऊ नयेत, अशी मागणी करणारा दावा सामाजिक कार्यकर्ते म. वि. अकोलकर यांनी लघुवाद न्यायालयात केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य शासनाला प्रतिवादी केले आहे.अकोलकर म्हणाले की, प्रतिवादींनी महानगरपालिकेची निवडणूक सदोष पद्धतीने घेतली आहे. ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आदेशपत्रानुसार घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने १९८४ मध्ये ईव्हीएमचा वापर रिप्रेझेंटेशन अ‍ॅक्टनुसार गैरकायदेशीर ठरविला आहे. १९८९ मध्ये या कायद्यात सुधार करून कलम ६१ नुसार नवी तरतूद करण्यात आली. त्यामध्ये निवडणूक आयोगाने परिस्थितीनुरूप या यंत्रांचा वापर करावा, असे त्यात नमूद आहे.तथापि, निवडणूक आयोगाने २००४ आणि २००९ मध्ये संपूर्ण देशभर सार्वत्रिक निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या १९८४ च्या आदेशाचा अवमान झाला आहे. पुणे पालिकेची निवडणूक घेणाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश धुडकावला आहे.(प्रतिनिधी)>ईव्हीएममधील हार्डवेअर सुरक्षित नाही. त्यामुळे मतदानात व्हायरस घुसण्याची, हॅकिंग होण्याची व मानवी हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता असते. या सर्वबाबी महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाल्या आहेत. अनेक मतदार व उमेदवारांची फसवणूक झाली आहे. सार्वजनिक हक्कावर बाधा आल्याने आपण हा दावा दाखल करीत आहोत, असे अकोलकर यांनी दाव्यामध्ये म्हटले आहे.