शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

नागरिकांना मिळणार सेवा अधिकार

By admin | Updated: November 1, 2014 02:11 IST

सेवा अधिकार कायदा (राइट टू सव्र्हिस ) आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय : शासकीय कार्यालयांमध्ये खोळंबा होणार नाही
मुंबई :  राज्यातील कुठल्याही नागरिकाचे शासकीय कार्यालयामधील काम विशिष्ट वेळेत झाले पाहिजे, यासाठी सेवा अधिकार कायदा (राइट टू सव्र्हिस ) आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. 
फडणवीस यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, या कायद्यामुळे नागरिकांच्या कामांचा शासकीय कार्यालयांमध्ये  खोळंबा होणार नाही. एखादी व्यक्ती सरकारी कार्यालयात कामासाठी कधी आली, त्याच्या कामाची कशी दखल घेण्यात आली, किती कालावधीत ते काम झाले, काम झाले नसेल तर त्यासाठी जबाबदार अधिकारी कोण, या बाबींचा कायद्यात समावेश असेल. जनतेला विहित कालावधीत न्याय न देणा:या अधिका:यांवर कारवाई केली जाईल. माहिती अधिकार कायद्याच्या धर्तीवर सेवा अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यतेखालील समिती या कायद्याचा मसुदा अहवाल एक महिन्याच्या आत तयार करेल आणि मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडला जाईल. 
फडणवीसांनी या वेळी राज्याला पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान सरकारची हमी दिली. राज्याचा सर्वसमावेशक विकास हाच आपल्या कामाचा फोकस असेल. प्रशासनात काम करताना चुका होऊ शकतात. पण बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी नोकरशाहीला दिला. 15 वर्षात राज्याची विस्कटलेली घडी बसायला वेळ लागेल, असे ते म्हणाले. 
राज्य टोलमुक्त केले जाईल, धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, एलबीटी रद्द केला जाईल, अशी आश्वासने प्रचारात दिली होती. ही सगळी आश्वासने निश्चितपणो पाळली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल. राज्याच्या हितासाठी जे जे करायचे आहे, ते केले जाईल आणि कुणाचाही दबाव स्वीकारला जाणार नाही, असे ते म्हणाले. 
पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा. त्यांना पेन्शन यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.  (विशेष प्रतिनिधी)
 
तर 52 हजार कोटींचे कर्ज काढावे लागेल
आघाडी सरकारने जाता जाता ज्या योजनांची घोषणा केली त्यासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे त्या कागदावर राहिल्या. आता त्यांची अंमलबजावणी करायची तर आणखी 52 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागेल. या घोषणांचा आढावा घ्यावा लागेल आणि फेरविचारही करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.
 
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह मागास भागाचा विकास हा आपला पहिला अजेंडा असेल. महाराष्ट्र नंबर एक वर आणण्यासाठी गुजरातसह सर्व राज्यांशी निकोप स्पर्धा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. 
 
समतोल साधण्याचा प्रयत्न
च्मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून समावेश करताना प्रांतिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. 
च्फडणवीस यांच्यासह मुनगंटीवार हे विदर्भातील, पंकजा मुंडे मराठवाडा, एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्र, चंद्रकांत पाटील व दिलीप कांबळे हे पश्चिम महाराष्ट्र तर विनोद तावडे, प्रकाश महेता, विष्णू सवरा आणि विद्या ठाकूर हे मुंबई-कोकण येथील प्रतिनिधित्व करतात. 
च्फडणवीस (ब्राrाण), पाटील, तावडे (मराठा), खडसे (लेवा पाटील), पंकजा मुंडे (ओबीसी), मुनगंटीवार (कोमटी), सवरा (आदिवासी), कांबळे (अनुसूचित जाती), प्रकाश महेता (गुजराती), विद्या ठाकूर (उत्तर भारतीय)