शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नगरला वादळी तडाखा ५० खांब पडले, वीजवाहक तारा तुटल्या

By admin | Updated: June 13, 2014 01:13 IST

नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले. तसेच वीजवाहक तारा तुटल्यामुळे सोमवारची रात्र शहरवासीयांना अंधारात काढावी लागली. युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महावितरणने मंगळवारी काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत केला.

अहमदनगर : नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले. तसेच वीजवाहक तारा तुटल्यामुळे सोमवारची रात्र शहरवासीयांना अंधारात काढावी लागली. युद्धपातळीवर यंत्रणा राबवून महावितरणने मंगळवारी काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत केला. सोमवारी रात्री पावसाने वादळी वार्‍यासह शहराला झोडपून काढले. त्याआधी प्रचंड वादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यातील काही वीजवाहक तारांवर पडल्याने अनेक ठिकाणचे खांब कोलमडले. तसेच तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नुकसान मोठे असल्याने शहरातील अनेक भागांत रात्रभर वीज नव्हती.अकरा केव्ही क्षमतेच्या नालेगाव उपकेंद्राला पुरवठा करणार्‍या वीजवाहक तारांवर मोठे लिंबाचे झाड कोसळल्याने उच्चदाबाचे ५ खांब जमिनीवर आले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली. त्या उपकेंद्राच्या अखत्यारित येणार्‍या लालटाकी, दिल्लीगेट, सिव्हील एक्स्प्रेस या फिडरवरील सर्व वीजपुरवठा तातडीने खंडित झाला. तसेच शहरांतर्गत व उपनगरांत उच्चदाबाचे एकूण १० व लघुदाबाचे ४२ खांब पडल्याने मोठा परिसर रात्रभर अंधारात होता.