शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या नावाने नागरिकांना धमकी

By admin | Updated: April 26, 2016 03:12 IST

नेरूळ सेक्टर २० मध्ये सोसायटीच्या गेटसमोर कार उभी करून रहिवाशांना धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला आहे

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० मध्ये सोसायटीच्या गेटसमोर कार उभी करून रहिवाशांना धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला आहे. नगरसेवकांचे नाव घेवून महिलांनाही शिवीगाळ केलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येथील नारायण स्मृती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या तरूणाने रविवारी त्याची कार (एमएच ४६ एडी १४४०) कृष्ण छाया इमारतीच्या गेटवर उभी केली. इमारतीमध्ये नागरिकांना ये - जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक ठेवला नाही. रहिवाशांनी विनंती करून गाडी थोडी पुढे घेण्याची विनंती केल्यानंतरही अर्धा तास तशीच उभी करण्यात आली. येथील एक नागरिकांकडे आलेल्या नातेवाइकाला त्याची मोटारसायकल बाहेर घ्यायची असल्याने त्यांनी सदर युवकाला विनंती केली की थोडीशी कार बाजूला घ्या, आम्हाला बाहेर निघू द्या. परंतु सदर युवकाने गाडी काढणार नाही. आम्ही आमची वाहने कुठे उभी करायची असा प्रश्न उपस्थित केला. मोटारसायकलस्वाराला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तुम्ही मला काय समजता ही नगरसेवकाची बिल्डिंग आहे. बोलावू का नगरसेवकांना अशी धमकीही त्याने यावेळी दिली. गेटच्या समोर उभी केलेली कार बाजूला घेण्यासाठी सोसायटीमधील रहिवासी खाली उतरून विनंती करू लागले. परंतु मद्यपान केलेल्या या तरूणाने महिलांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. माझ्याविरोधात कुठे तक्रार करायची ते करा, पोलीस स्टेशनमध्येही जा, मला फरक पडत नसल्याचा दम दिला. या प्रकारामुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या तरूणाविषयी संबंंधित नगरसेवक व पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.