शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

By admin | Updated: July 4, 2016 01:20 IST

भारनियमन सुरू असतानाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या विजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.

चंदननगर : उन्हाळ्यात खराडी-चंदननगर-वडगावशेरी भागात महावितरणचे अघोषित भारनियमन सुरू असतानाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या विजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री-अपरात्रीदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिक व नगरसेवक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महावितरणने प्रभाग क्रमांक १८ सोडून इतर सर्व म्हणजे प्रभाग २, ३, १९ येथील अनेक भागांत, भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम अर्धवटच सोडले आहे. वडगावशेरी मतदारसंघात १०० कोटींचा निधी मंजूर करून तीन वर्षे उलटली, तरीही अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. उन्हाळ्यात अघोषित भारनियमानाने हैराण झालेल्या खराडी-चंदननगरकरांना आता पावसाळ्यातही विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. मागील सहा-सात महिन्यांपासून खराडी- चंदननगरच्या तुळजाभवानीनगर, राजाराम पाटील नगर, पाटीलबुवानगर, खराडीगाव, चौधरीवस्ती, चंदननगर बाजार परिसर, बोराटेवस्ती, वडगावशेरी गणेशनगर, सोमनाथनगर, आनंदपार्क आदी भागातील आदी भागांना वारंवार वीजपुरवठा खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून परिसरातील नगरसेवकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. खराडीतील महावितरण केंद्र व शास्त्रीनगर येथील केंद्रावर नगरसेवक महेंद्र पठारे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली; मात्र अधिकारी काहीच करत नसल्याने नगरसेवकांसह नागरिक हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)>तारा टेकल्या जमिनीलातुळजाभवानीनगर येथील वीज गायब असून, अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर दुसरीकडे खराडीतील थिटेवस्ती येथे विजेच्या तारा अगदी जमिनीला टेकायला लागल्या, तरी महावितरण अधिकारी लक्ष देत नाहीत. भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामाला निधी दोन वर्षांपासून निधी पडून असूनदेखील अधिकारी का काम करत नाही, असा सवाल नागरिकांना पडला आहे. मी याभागात येऊन वीस दिवस झाले असून, परिसरातील समस्यांची माहिती घेत आहे. प्रत्यक्ष पाहणी करून विजेचा प्रश्न सोडविणार आहे. -किशोर पाटील, मुख्यअभियंता विद्युत विभाग, नगर रस्ता