शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या काळात नागरिक ‘गॅस’वर

By admin | Updated: February 11, 2017 02:23 IST

गेल्या आठवड्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्रापूर येथील एलपीजी गॅस सिलिंडर कंपनीकडून शहरात गॅस सिलिंडरचे वितरण होते.

पिंपरी : गेल्या आठवड्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिक्रापूर येथील एलपीजी गॅस सिलिंडर कंपनीकडून शहरात गॅस सिलिंडरचे वितरण होते. मात्र, गॅस भरण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात गॅस सिलिंडरचे वितरण होत नसल्याचे शहरात टंचाई आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे प्रचार, मतदारांच्या गाठीभेटी, पक्षाची इतर कामे करत असतानाच घरातील सिलिंडर संपल्याने अधिकच तारांबळ उडत आहे. पर्यायी मार्ग शोधण्यासाठी ग्राहकांना भटकंती करावी लागत आहे. पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत आहे. आॅनलाइन सिलिंडर नोंदविल्यानंतर दोन ते तीन दिवसांत गॅस घरपोच मिळतो. मात्र, गेल्या आठवड्यापासून नोंदणी करून देखील सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता, तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, शिक्रापूर येथील सिलिंडर वितरण कंपनीमध्ये गॅस भरण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाला आहे. तोदुरुस्त झाल्यानंतर पूर्ववत वितरण होईल.’’ मागणी नोंदविल्यानंतर चार-पाच दिवस सिलिंडरची डिलिव्हरी द्यायची असा कंपनीचा आदेश आहे. बुकिंगनंतर डिलिव्हरी होत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. बिघाड होण्याआधी प्रतिदिन एजन्सीकडून ग्राहकांना ४०० सिलिंडरचे वितरण होत असते. परंतु कंपनीकडून पुरेसा माल येत नसल्याने प्रतीक्षायादी वाढली आहे. बऱ्याच ग्राहकांना पूर्वकल्पना नसल्याने थेट एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करावी लागत आहे. अनेकवेळा सिलिंडर घरी आल्यावर पावतीवर दर्शविलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कमेची मागणी केली जाते. याबाबत विचारणा केली असता उंच इमारत असल्याने वर चढविण्यास कंपनी खर्च देत नसल्याचे कारण सांगितले जाते. गेल्या १५ दिवसांपासून पिंपरी, मासूळकर कॉलनी, नेहरूनगर, चिंचवड, निगडी, काळेवाडी, थेरगाव, प्राधिकरण परिसरात घरगुती सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत.(प्रतिनिधी)