शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तपासाबाबत नागरिकांमध्ये साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:22 IST

बांधकामाच्या ठिकाणी खड्ड्यात पडून दोघा भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दहा ते बारा दिवस उलटूनही ठेकेदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही

भोसरी : बांधकामाच्या ठिकाणी खड्ड्यात पडून दोघा भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दहा ते बारा दिवस उलटूनही ठेकेदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ठेकेदार व तेथील सुपरवायझरचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलीस फौजदार नीलेश जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अटकेसंदर्भात पोलिसांना विचारले असता, पोलिसांनी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ठेकेदाराला अटक केलीनसल्याचे सांगितले होते. मात्र, आता ठेकेदार पसार असल्याचे सांगण्यात येत असल्याने पोलिसांच्या तपासावर साशंकता असल्याचे बोलले जात आहे. मागील आठवड्यात भोसरीतील अयप्पा मंदिराजवळ इमारतीच्या बांधकामाच्या खड्ड्यात वैष्णवी किस्त्या राठोड (वय ५) आणि विराट किस्त्या राठोड (वय ३) या बहीण-भावांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी किस्त्या राठोडच्या फिर्यादीनुसार, इमारतीचे बांधकाम करणारा ठेकेदार हनुमंत राठोड व तेथील सुपरवायझर भोजू जाधव यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या अटकेसंदर्भात बांधकाम कंपनी व ठेकेदार यांच्यात झालेल्या बांधकामाच्या करारासंदर्भात कागदपत्रांची तपासणी सुरू असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ठेकेदाराला अटक करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, रविवारी (दि. १५) पुन्हा तपासाधिकारी जगदाळे यांना ठेकेदाराच्या अटकेसंदर्भात विचारले असता, त्यांनी ठेकेदार फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या तपासावर साशंकता असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पोलीसच ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत की काय, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. (वार्ताहर)