शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी केलेल्या तक्रारी ही परकीय सरकारांची गुपिते!

By admin | Updated: June 6, 2016 02:56 IST

राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात

मुंबई : राज्य शासनाच्या संकेत स्थळावरील ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर नागरिकांनी आॅनलाइन नोंदविलेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण ही ‘परकीय सरकारांकडून गोपनीय स्वरूपात मिळालेली माहिती असल्याने’ याच्या प्रती उपलब्ध करून देता येणार नाहीत, असे धक्कादायक उत्तर मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव सुदाम गवळी यांनी दिले आहे.ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केलेल्या ‘आरटीआय’ अर्जावर गवळी यांनी हे उत्तर दिले आहे. हे उत्तर देणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्याच्या अगाध ज्ञानापुढे हसावे की रडावे या पेचात पडलेल्या गांधी यांनी आता न मिळालेली माहिती मिळविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अपिलीय माहिती अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. गांधी यांनी हा आरटीआय अर्ज गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी केला होता. पाच महिने त्या अर्जाची सामान्य प्रशासन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय, माहिती तंत्रज्ञान संचालनालय अशी टोलवाटोलवी केल्यानंतर हे उत्तर देण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलवर किती तक्रारी प्राप्त झाल्या व त्यापैकी किती तक्रारींचे निवारण करण्यात आले, असे गांधी यांनी विचारले होते. अर्ज नोव्हेंबर २०१५मधील होता. त्यामुळे त्याआधीच्या सहा महिन्यांत एकूण ९,८८९ तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या, अशी माहिती गवळी यांनी दिली. निकाली निघालेल्या तक्रारींचा ९,४६० हा आकडा मात्र यंदाच्या ३० एप्रिलपर्यंतचा देण्यात आला. हे दोन्ही आकडे एकाच कालखंडाशी संबंधित नसल्याने त्यांची सांगड कशी घालावी, असा प्रश्न आहे.दाखल झालेल्या तक्रारी व त्यांचे केले गेलेले निवारण यांच्या प्रतीही गांधी यांनी सीडीवर मागितल्या होत्या. गवळी यांनी अगाध ज्ञान पाजळत याचे असे उत्तर दिले - ‘दाखल झालेल्या तक्रारी व त्यांचे झालेले निराकरण यांच्या प्रती माहितीचा अधिकार अधिकार अधिनियम २०१५च्या कलम ८(१)(एफ)नुसार आपणास देता येत नाहीत.’ (विशेष प्रतिनिधी)