शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शहरांना काविळीचा धोका

By admin | Updated: July 28, 2015 00:41 IST

वेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये

- राहुल कलाल,  पुणेवेगाने वाढणारी लोकसंख्या, दाटिवाटीने राहणारे नागरिक, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव, सांडपाण्याची नसलेली चोख व्यवस्था आदींमुळे राज्याच्या शहरी भागांमध्ये काविळच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. गेल्या ४ वर्षात राज्यात आढळलेले कावीळचे रुग्ण प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजच्या उपनगरांमध्ये दिसून आले आहेत.गेल्या ४ वर्षांच्या आकडेवारीवरून शहरी भागांमध्ये त्यातही प्रामुख्याने शहराच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये काविळीचा उद्रेक होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत राज्य आरोग्य विभागाचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात राज्यात काविळीचे उद्रेक हे प्रामुख्याने शहरी व त्याच्या आजूबाजूला वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. इचलकरंजी, अहमदनगर, जळगाव आदी याची उदाहरणे आहेत. शहरी भागात दाटीवाटीने राहणारे लोक, वाढती लोकसंख्या त्यामुळे स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळणे, सांडपाण्याची व्यवस्था नसणे, १९६०-७० या दशकांमध्ये टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या पाईपलाईन न बदलणे आदींमुळे दूषित पाणी नागरिक पितात. त्यातून काविळीची लागण होत असल्याचे दिसून आले आहे.हिपॅटायटिस अर्थात काविळ या आजाराचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी ‘हिपॅटायटिस ए’ आणि ‘हिपॅटायटिस ई’ हे दोन प्रमुख प्रकार दूषित पाणी, दूषित अन्नाच्या सेवनामुळे होतात. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही भागांमध्ये काविळीचा उद्रेक होतो. यामध्ये प्रामुख्याने शहरी भाग त्यातही शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा आजूबाजूला उपनगराच्या रूपात पसरणाऱ्या भागात काविळीचा उद्रेक होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत राज्यात काविळीचे ९ उद्रेक झाले आहेत. यात २६६ जणांना काविळीची लागण झाली असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे. यात यंदा जळगाव शहर व आजूबाजूच्या परिसरात काविळीचा उद्रेक झाला होता. त्यात तेथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबर यावर्षी सांगली, नागपूर, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या शहर व आजूबाजूंच्या परिसरामध्येही काविळीचे उद्रेक झाले आहेत. याअगोदर २०१४ मध्ये राज्यात काविळीचे १३ उद्रेक झाले आणि यात १ हजार ७७५ जणांना काविळीची लागण झाली होती. तीन जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षात अहमदनगर शहर व परिसरात काविळीचे भीषण उद्रेक पहायला मिळाले.२०१३ मध्ये राज्यात काविळीची तीव्रता कमी झाल्याचे चित्र होते. राज्यात उद्रेक झाले तरी कमी रुग्णांना काविळीची लागण झाली होती. या वर्षात राज्यात काविळीचे १२ उद्रेक झाले. त्यात ३३३ जणांना काविळीची लागण झाली होती आणि ३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ हे वर्ष काविळीने हादरविले होते. यावर्षात इचलकरंजीमध्ये काविळीचा सर्वात मोठा उद्रेक झाला होता. या वर्षात काविळीची लागण झालेल्या तब्बल ६ हजार ३३७ रुग्णांपैकी ४२ जणांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०० रूण एका इचलकरंजीमधून सापडले होते. यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.